Radhe Movie : सलमानला ‘राधे’साठी लाखोंचं नुकसान, वाचा किती कोटींची झाली डील

सलमान खानचा ‘राधे’ चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण जगभरात हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. (Radhe Sold Out: lost Millions to Salman for 'Radhe' Film, read how many crores the deal was)

  • Updated On - 12:09 pm, Thu, 13 May 21
Radhe Movie : सलमानला ‘राधे’साठी लाखोंचं नुकसान, वाचा किती कोटींची झाली डील

मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे’ (Radhe) चित्रपट आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. संपूर्ण जगभरात हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार होता मात्र लॉकडाऊनमुळे सलमान खान आणि संपूर्ण टीमनं हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ZeePlex आणि ZEE5 वर रिलीज करण्याचं ठरवलं आहे.

ओटीटीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी डील

सलमान खाननं हा चित्रपट ‘झी’ ग्रुपला 230 कोटींमध्ये विकला असल्याची बातमी होती आणि ही डील ओटीटीवरील आतापर्यंतची सर्वात मोठी डील असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र नंतर भारतातील चित्रपटगृहं सुरू होतील आणि हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल असा अंदाज होता मात्र कोरोना परिस्थितीमुळे हा चित्रपट आता ओटीटीवरच प्रदर्शित होणार आहे.

मार्चपासून कोरोना परिस्थिती अजूनच खराब झालीये आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं आता देश हादरला आहे. पर्यायी सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आता पुन्हा चित्रपटांच्या रिलीजला ग्रहण लागलं आहे.

ईदला मिळणार मनोरंजनाची मेजवानी

चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ‘राधे’ हा चित्रपट ईदच्या दिवशीच रिलीज करण्याचं सलमान खानने आपल्या चाहत्यांना वचन दिलं होतं. त्यामुळे सलमाननं आपला चित्रपट पुढे ढकलण्याऐवजी तो ओटीटीवर रिलीज करण्याचा धोका पत्करला आहे.

यासाठी झी ग्रुपनं जुने दर 230 कोटी वरून 190 कोटींवर बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बॉलिवूड हंगामानं ही माहिती प्रकाशित केली आहे. जर आपण आकडेवारीचा विचार केला तर हा ओटीटीवरील आतापर्यंतचा सर्वात महागडी डील असल्याचं म्हटलं जात आहे.

सलमाननं हे स्वीकारलं कारण त्याची इच्छा होती की हा चित्रपट त्याच्या चाहत्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत ईदला पाहावा.

दुबईमध्ये रेड कार्पेट प्रीमियर

‘राधे’ हा चित्रपट दुबईसह जगातील इतर देशांतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी 12 मेला दुबईमध्ये रेड कार्पेट प्रीमियरही आयोजित करण्यात आला आहे. ज्यासाठी सलमानच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय.

ZEEPlex आणि Zee5 वर पाहा चित्रपट

राधे या चित्रपटासाठी 249 रुपये देऊन, तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत हा चित्रपट ZEEPlex आणि Zee5 वर पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट एकदा पैसे दिल्यानंतर एकदाच पाहता येईल. तुम्हाला हा चित्रपट पुन्हा पाहण्याची इच्छा असेल तर तुम्हाला पुन्हा पैसे द्यावे लागतील. ही किंमत 249 रुपये ठेवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Swarajya Janani Jijamata : सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका, ‘स्वराज्य जननी जिजामाता’मधून जागा होणार इतिहास

Photo : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचा 2 वर्षात मेकओव्हर, प्रोड्युसर म्हणून नवी इनिंग सुरू