Swarajya Janani Jijamata : सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका, ‘स्वराज्य जननी जिजामाता’मधून जागा होणार इतिहास

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका हा मराठेशाहीच्या इतिहासातील रोमांचक अध्याय मालिकेतून प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. (Shivaraya's release from the siege of Siddhi Johar, history will be awakened from 'Swarajya Janani Jijamata')

Swarajya Janani Jijamata : सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका, ‘स्वराज्य जननी जिजामाता’मधून जागा होणार इतिहास
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 11:51 AM

मुंबई : पन्हाळगडाच्या कडेकोट वेढ्यातून निसटून विशाळगडावर पोहोचेपर्यंतचा थरार रोमांचकारी आहे. स्वराज्यसंघर्षातील रणसंग्रामात सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून, खडतर मार्गावरून पन्हाळा ते विशाळगड असा प्रवास शिवरायांनी आणि त्यांच्या 300 बहाद्दर मावळ्यांसोबत केला. अंगावर शहारे आणणारा या रक्तरंजित पर्वाचा इतिहास सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ (Swarajya Janani Jijamata) या मालिकेच्या येत्या भागांतून उलगडणार आहे.

विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम

प्रतापगडाचा पराभव आदिलशहाच्या चांगलाच जिव्हारी लागला. या पराभवानंतर आदिलशहानं सिद्धी जौहरला महाराजांच्या बंदोबस्तासाठी पन्हाळ्याला पाठवलं. प्रचंड पावसात वेढा चालवणं विजापूरी सैन्यास अशक्य होईल हा छत्रपती शिवरायांचा अंदाज सिद्धीनं खोटा ठरवला. या कडेकोट वेढ्यातून निसटून जाण्यासाठी निवडक मावळे घेऊन दुर्गम मार्गाने विशाळगडाकडे भर पावसात रात्रीच्या वेळी निसटण्याची मोहीम महाराजांनी आखली. या मोहिमेतील शिवा काशिदांचे हौतात्म्य, बाजी-फुलाजी बंधूंचा पराक्रम, बांदलांच्या अज्ञात मावळ्यांचे शौर्य आणि बलिदान, विशाळगडाच्या पायथ्याशी महाराजांचा घनघोर संग्राम या साऱ्या पराक्रमी प्रसंगांची गाथा या विशेष भागातून उलगडणार आहे.

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांची सुटका हा मराठेशाहीच्या इतिहासातील रोमांचक अध्याय मालिकेतून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यत पोहचावा यासाठी मालिकेच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे. कृत्रिम पावसाच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी हे सारे प्रसंग चित्रित करण्याचे जिकीरीचे आव्हान मालिकेच्या संपूर्ण टीमने पेलल्याचे निर्माते सांगतात.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका विशेष भाग

या यशस्वी मोहिमेचे साक्षीदार होत या पराक्रमी इतिहासाला पुन्हा उजाळा देण्यासाठी सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका आज म्हणजेच बुधवार 12 मे ते शुक्रवार 14 मे दरम्यान रात्री 8.30 वा. या पर्वाचा विशेष भाग सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचा 2 वर्षात मेकओव्हर, प्रोड्युसर म्हणून नवी इनिंग सुरू

Photo : ‘गौतमीच्या सायकलची गोष्ट…’, लाडक्या सईचा हा हटके अंदाज पाहिलात?

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.