Photo : ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचा 2 वर्षात मेकओव्हर, प्रोड्युसर म्हणून नवी इनिंग सुरू

बिग बॉस 13 पासून 2 वर्षांमध्ये शहनाज गिल जबरदस्त बदलली आहे. ('Bigg Boss' fame Shahnaz Gill's makeover in 2 years, new innings begins as producer)

1/7
Shehnaaz Gill
अभिनेत्री शहनाज गिल बिग बॉस 13 मध्ये झळकली तेव्हा तिला पंजाबच्या कतरिना कैफ असं म्हटलं गेलं होतं. आजही तिला स्वत:ला हे म्हणून घ्यायला आवडतं. बिग बॉस 13 पासून 2 वर्षांमध्ये शहनाज गिल जबरदस्त बदलली आहे. आता तिला स्वतःची एक वेगळी ओळख आहे.
2/7
Shehnaaz Gill
शहनाज गिल व्यावसायिक आणि वैयक्तिक आघाडीवर तिच्या कारकीर्दीत प्रचंड बदल केले आहेत आणि तिला यशही मिळत आहे. शहनाज आता निर्माती बनली आहे. नुकतंच एका व्हिडीओ गाण्याद्वारे अभिनेत्रीनं निर्माती म्हणून पदार्पण केलं असून यासाठी सर्वत्र तिचं कौतुक होतं आहे.
3/7
Shehnaaz Gill
नुकतंच तिचा खास मित्र सिद्धार्थ शुक्ला यानंही तिचं अभिनंदन केलंय. त्याने शहनाजचं कौतुक केलं आणि आपल्या मैत्रिणीच्या या कामगिरीमुळे तो खूप आनंदीत दिसत होता.
4/7
Shehnaaz Gill
बिग बॉस 13 पासून शहनाज गिल फक्त पंजाबच नाही तर भारतीय टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा बनली आहे. बर्‍याच सुपरहिट व्हिडीओंचा ती एक भाग देखील आहे. बादशाह सोबतच्या तिच्या नवीन व्हिडीओचंही रसिकांनी खूप कौतुक केलंय.
5/7
Shehnaaz Gill
त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता शहनाज आधीसारखी दिसत नाही. तिच्या लूकवर आणि फिटनेसवर तिनं प्रचंड काम केलं आहे.
6/7
Shehnaaz Gill
जेव्हा शहनाज सुरुवातीला बिग बॉस 13 मध्ये आली तेव्हा ती थोडी जाड आणि वेगळी होती. ती एक बडबड करणारी अभिनेत्री होती आणि तिच्या या स्टाईलला चाहत्यांनी खूप पसंत केलं.
7/7
Shehnaaz Gill
पण या दोन वर्षांमध्ये शहनाझनं स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणलेत. तिनं आपल्या फिटनेस आणि फिगरकडेही लक्ष दिलं आहे. काळाची मागणी पाहता या अभिनेत्रीनं वजन कमी केलं आहे आणि आता ती स्लिम बनली आहे.