AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू; चौकशीनंतर पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीच्या निधनाबद्दल पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रविवारी एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून राहुलचा मृत्यू झाला होता. पोलीस नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू; चौकशीनंतर पोलिसांकडून धक्कादायक खुलासा
Rahul BanerjeeImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 30, 2026 | 2:56 PM
Share

प्रसिद्ध बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शूटिंगदरम्यान समुद्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी राहुल ओडिशाच्या तलसारीमध्ये ‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेसाठी शूटिंग करत होता. शूटिंगदरम्यान तो पाण्यात उतरला आणि काही वेळातच बुडू लागला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर राहुलला दीघा इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वयाच्या 43 व्या वर्षी राहुलने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी आता तलसारी मरीन पोलिसांनी याला ‘अनैसर्गिक मृत्यू प्रकरण’ म्हणत मोठा खुलासा केला आहे. मालिकेच्या शूटिंगसाठी त्याठिकाणी परवानगी घेतली नव्हती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

तलसारी मरीन पोलीस ठाण्याचे ICC शरबन कुमार मोहराना हे ‘एनडीटीव्ही’शी बोलताना म्हणाले, “शूटिंगच्या आधी पोलिसांकडून कोणतीच परवागनी घेतली नव्हती आणि पोलीस ठाण्यात शूटिंगबद्दल कोणतीच माहितीसुद्धा देण्यात आली नव्हती. दीघा रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला. याप्रकरणी आम्ही अनैसर्गिक मृत्यू प्रकरण म्हणून केस दाखल केली असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.”

राहुल बॅनर्जीच्या निधनानंतर त्याची पत्नी प्रियांका सरकारने एक निवेदन जारी करत त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे. ‘आमच्यासाठी ही अत्यंत दु:खद आणि निराशेची वेळ आहे. या कठीण काळात आम्ही आमच्या गोपनीयतेचा आदर करण्याची तुम्हाला विनंती करतो’, असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. यामध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘इथे एक मूल, एक आई, एक कुटुंब आणि प्रियजन आहेत, जे या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही माध्यमांतील आमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना विंती करतो की, त्यांनी आमच्या मर्यादांचा आदर करावा. आमच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करू नये. आम्हाला शांततेत आणि सन्मानाने दु:ख व्यक्त करण्याची संधी द्यावी. या कठीण काळात तुमच्या पाठिंब्याची आम्हाला पूर्वीपेक्षाही अधिक गरज आहे.’

पत्नीची पोस्ट-

राहुल जेव्हा समुद्रात शूटिंगसाठी उतरला, तेव्हा जोरदार लाटांमुळे किंवा पाण्याच्या खोलीमुळे त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. सेटवर असलेल्यांना परिस्थिती इतकी गंभीर होईल याची पुसटशीही कल्पना नव्हती. समुद्रात गेलेला राहुल बराच वेळ बाहेर न परतल्याने क्रू मेबर्सना चिंता वाटू लागली आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला होता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा