Raj Kapoor : तिच्यासाठी राज कपूर यांनी स्वत:ला सिगारेटचे चटके दिले, कोण होती ती अभिनेत्री?
Raj Kapoor : "काही दिवस रोज रात्री राज कपूर दारु पिऊन घरी यायचे. तिच्या आठवणींमध्ये भरपूर रडायचे. माझा नवरा दुसऱ्या स्त्रीसाठी रडतोय हे पाहण माझ्यासाठी हा खूप कठीण काळ होता" असं कृष्णा कपूर लेखक बनी रुबेन यांच्याशी बोलताना म्हणाल्या होत्या.

हिंदी सिनेमा सृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांना कधीच विसरता येणार नाही. राज कपूर हे त्यापैकीच एक नाव. राज कूपर यांना बॉलिवूडमधलं कपिल देव म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण ते ऑलराऊंडर होते. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक अशा सगळ्या रोलमध्ये ते हिट होते. राज कपूर यांचं हिंदी सिनेमा सृष्टीतील योगदान कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांनी हिंदी सिनेमाला देशाबाहेर परदेशात पोहोचवलं. तिथे बॉलिवूडचा चाहता वर्ग निर्माण केला. राज कपूर यांच्या सिनेमाच वैशिष्ट्य म्हणजे परफेक्शन. फक्त अभिनयच नाही, स्टोरी, सिनेमॅटोग्राफी, संगीत, पार्श्वसंगीत या सगळ्यांमध्ये त्यांचा सिनेमा उत्तम असायचा. उणीवा काढायला फार कमी संधी असायची. महत्त्वाच म्हणजे राज कपूर यांच्या सिनेमातील नायिका. त्यांच्या नायिकांची सर्वात जास्त चर्चा व्हायची. त्यांनी नायिकांच एक वेगळं रुप, बाजू प्रेक्षकांना दाखवली. राज कपूर यांचा नेहमीच सिनेमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असायचा. चित्रपटाच्या सर्व अंगांवर भक्कम पकड आणि प्रेक्षकांची अचूक नस ओळखणारा दिग्गज म्हणजे राज कपूर. हे राज कपूर यांना जन्म शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने हिंदी सिने सृष्टीत...