AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा अश्लील सिनेमा प्रकरण, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी

उद्योगपती राज कुंद्रा यांची पत्ती आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रा शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात येत आहे. शिल्पा शेट्टीच्या जुहू इथल्या घरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली जात आहे.

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा अश्लील सिनेमा प्रकरण, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी
Raj kundra, Shilpa Shetty
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 7:25 PM
Share

मुंबई : अश्लील चित्रपट प्रकरणात अटकेत असलेले उद्योगपती राज कुंद्रा यांची पत्ती आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रा शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यात येत आहे. शिल्पा शेट्टीच्या जुहू इथल्या घरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केली जात आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी शिल्पा शेट्टीचा जबाब घेत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राज कुंद्रा यांना 19 जुलैला अटक केल्यानंतर त्यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. (Crime Branch interrogates Bollywood actress Shilpa Shetty in raj kundra case)

राज कुंद्राच्या घरावर छापा

गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले, जे ‘हॉटशॉट’साठी बनवले गेले होते. राज याला याबाबत विचारले असता तो म्हणाले की, ते इतर ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच बोल्ड कंटेंट तयार करतात, परंतु हे सर्व ‘प्रौढ’ व्हिडीओंसाठी केले गेलेले नाही.

राज कुंद्रावर केवळ या अश्लील सामग्री बनवल्याच नाही, तर लोकांना काम देण्याच्या बहाण्याने लोकांकडून अश्लील व्हिडीओ बनवून घेतल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

शिल्पा शेट्टीने प्रथमच मौन सोडत व्यक्त केल्या मनातील भावना

शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये जे पान शेअर केले आहे त्यामध्ये पुढे असे लिहिले आहे की, ‘आम्ही आपल्या गमावलेल्या वेळेकडे रागाने पाहतो. ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांच्याबद्दल आपला राग जागतो, ज्यामुळे आपण दु:ख भोगले आहे आणि आपण दुर्दैवाने वेढलेले आहोत. आपण आता आपल्या नोकर्‍या व करार जातील या भीतीने आपण भविष्याकडे पहात आहोत किंवा एखाद्या आजारामुळे प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

या पृष्ठामध्ये पुढे असेही लिहिले आहे की, ‘आपण काय घडले आहे आणि काय घडू शकते याबद्दल काळजी करू नये, परंतु आपण सध्या काय घडत आहे याबद्दल जागरूक व सावध असले पाहिजे.’

काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.

संबंधित बातम्या :

Raj Kundra Case | आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा, राज कुंद्राची मुंबई हायकोर्टात धाव

राज कुंद्रावर नग्न ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप, आता बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा अभिनेत्रीचा दावा

Crime Branch interrogates Bollywood actress Shilpa Shetty in raj kundra case

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.