AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सोडा… महाराजांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे आगामी 3 मोठे सिनेमे, बजेट तर गगनाला भिडणारे

Chhatrapati Shivaji Maharaj Films : 'या' 3 सिनेमांपुढे 'राजा शिवाजी' पडणार फिका? महाराजांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे 'हे' 3 सिनेमे लवकरच होणार प्रदर्शित... बजेट जाणून उंचावतील भुवया..., सध्या सर्वत्र सिनेमांची चर्चा आहे सुरु....

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सोडा... महाराजांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे आगामी 3 मोठे सिनेमे, बजेट तर गगनाला भिडणारे
| Updated on: May 07, 2026 | 8:28 AM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Films : बॉक्स ऑफिसवर सध्या कोणत्या सिनेमाचा बोलबाला असेल तर, त्या सिनेमाचं नाव आहे ‘राजा शिवाजी’, 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने मराठी आणि हिंदी भाषेत मोठी कमाई केली आहे. सिनेमात रितेश देशमुख, सलमान खान यांच्यासोबत अन्य लोकप्रिय बॉलिवूडकरांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण महाराजांच्या शौर्य गाधेवर आधारलेले अन्य तीन सिनेमे लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. सिनेमांची कास्ट आणि बजेट देखील फार तगडा आहे… तर जाणून घ्या कोणते आहे ‘ते’ तीन सिनेमे आणि त्या सिनेमांपुढे रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा फिका ठरेल का?

1. प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज

तीन सिनेमांच्या यादीत ‘प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ अव्वल स्थानी आहे. दिग्दर्शक संदीप सिंग द्वारा दिग्दर्शित हा पॅन-इंडिया प्रोजेक्ट आहे… सिनेमाचं बजेट फार मोठं आहे. हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या ऐतिहासिक सिनेमांपैकी एक असल्याची चर्चा असून सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या ऐतिहासिक सिनेमांपैकी एक ठरेल. हा सिनेमा शिवाजी महाराजांचा बालपणापासून ते एक महान शासक म्हणून उदयास येण्यापर्यंतचा प्रवास दाखवणार आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हॉलिवूडच्या दर्जाचे असतील असा दावा देखील दिग्दर्शकांनी केला आहे.

2. वेडात मराठे वीर दौडले सात

ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर एक अशी कथा घेऊन येत आहेत, ज्याची प्रत्येक इतिहासप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं नाव आहे “वेडात मराठे वीर दौडले सात”. या सिनेमाचं सर्वात मोठे वैशिष्ट्य बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार असून तो पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

3. रुद्रांश: लिगेसी ऑफ अ ग्रेट किंग

वरील दोन सिनेमांप्रमाणेच ‘रुद्रांश: लिगेसी ऑफ अ ग्रेट किंग’ सिनेमा महाराजांवर आधारिक आहे. सिनेमात फक्त युद्ध नाही तर, ही एका महान वारशाला दिलेली आदरांजली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे, सिनेमात महाराज आणि त्यांचं पूत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील नात्यावर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. हा सिनेमा मराठा साम्राज्याचा कणखरपणा आणि अढळ धैर्य दर्शवतो, जे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे.

ट्रेड एनालिस्ट यांचं म्हणणं आहे की, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने हे सिद्ध केलं आहे की, प्रेक्षकांना देखील इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा शौर्य, नैतिकता आणि युद्धकौशल्याचा असा खजिना आहे. महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्याच्या माध्यमातून समोर येत असलं तरी त्यांच्या शौर्यापुढे कमीच आहे…

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...