AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची गगनभरारी, तिसऱ्या मंगळवारीही तूफान कामगिरी, आत्तापर्यंत…

Raja Shivaji BO Day 19 : अभिनेता रितेश देशमुख याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे. तिसऱ्या आठवड्यातीही या चित्रपटाची घोडदौड थांबलेली नून बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई केली आहे. 19 दिवसांत या चित्रपटाने केलेली कमाई...

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' चित्रपटाची गगनभरारी, तिसऱ्या मंगळवारीही तूफान कामगिरी, आत्तापर्यंत...
Raja Shivaji movie Box office collection
| Updated on: May 20, 2026 | 8:29 AM
Share

दर आठवड्याला बॉक्स ऑफीसवर नवनवे चित्रपट येत असतात, पण त्यातले फारच कमी टिकून राहतात. लोकांचा प्रतिसाद मिळाल्यावर चित्रपटाची तूफान घोडदौड सुरू होते आणि हेच चित्र सध्या दिसत आहे ते रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल. मे महिन्याच्या पहिल्या तारखेला रिलीज झालेला हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये असून याच काळात इतर अनेक नवे चित्रपट रिलीज झाले तरी ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाला जबरदस्त यश मिळताना दिसत आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर पकड मजबूत केली असून ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाहीये.

आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचलेल्या या चित्रपटाची घोडदौड कायम असून बॉक्स ऑफीसवर तूफान कमाई करत आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 19 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी किती कमाई केली? चला जाणून घेऊया..

19 व्या दिवशी चित्रपटाची कमाई किती ?

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याची खूप हवा झाली, प्रचंड चर्चाही सुरू होती. रितेश देशमुखची मुख्य भूमिका आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर तो अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने दुसऱ्याच आठवड्यात आपला संपूर्ण खर्च वसूल केला आणि त्यानंतरही लाखो रुपये कमावत पिक्चरने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तिसऱ्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची कमाई 2 कोटींच्या जवळपास असली तरी, या पिक्चरची एकूण कमाई दररोज वाढतच आहे.

– दरम्यान, ‘राजा शिवाजी’चित्रपटाच्या च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावले.

– त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 24.30 कोटी रुपये कमावले.

– 15 व्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 1.45 कोटी रुपये, 16 व्या दिवशी 2.70 कोटी, 17 व्या दिवशी 3.45 कोटी आणि 18 व्या दिवशी या चित्रपटाने 1.15 कोटी कमावले.

– सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 19 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने 1.30 कोटी रुपये कमावले.

– यामुळे, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची 19 दिवसांनंतरची भारतातील निव्वळ कमाई आता 87 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

18 दिवसांतील किती कमावला नफा ?

मराठी आणि हिंदी आवृत्त्यांसह, या चित्रपटाने भारतात एकूण 87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट 75 कोटी रुपये होते, म्हणजेच आता या चित्रपटाने 13 कोटी रुपयांचा नफा कमावला असून, नफ्याचे प्रमाण 17.33 % आहे. हिट होण्यासाठी, रितेश देशमुखच्या या निर्मितीला आपली गुंतवणूक दुप्पट, म्हणजेच 150 कोटी रुपये कमवावे लागतील.

100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची तयारी !

भारतीय बॉक्स ऑफिसवर आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा ओलांडलेला नाही. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला इतिहास रचण्यासाठी अजून 13 कोटी रुपयांची गरज आहे. चौथ्या आठवड्यापर्यंत हा ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा हा बहुप्रतिक्षित टप्पा गाठून मराठी चित्रपटसृष्टीत देखील इतिहास घडवेल अशी अपेक्षा आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......