AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला कुणी ढुंकूनही पाहिलं नाही… माझा इगो… रजनीकांत यांचं भाषण का होतंय व्हायरल? श्री श्री रविशंकर यांच्यासमोरच…

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचं श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये दिलेलं भाषण सध्या व्हायरल होत आहे. या भाषणात त्यांनी आपला अहंकार कसा गळून पडला याचा अनुभव शेअर केला. सत्संगात त्यांना कुणीही ओळखलं नाही, ज्यामुळे त्यांचा इगो पूर्णपणे संपला. हा अविस्मरणीय प्रसंग त्यांच्या आध्यात्मिक प्रवासातील महत्त्वाचा क्षण ठरला.

मला कुणी ढुंकूनही पाहिलं नाही... माझा इगो... रजनीकांत यांचं भाषण का होतंय व्हायरल? श्री श्री रविशंकर यांच्यासमोरच...
अभिनेते रजनीकांत
| Updated on: May 17, 2026 | 2:49 PM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बंगळुरूमध्ये भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रजनीकांत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता, निर्माता मोहन बाबू उपस्थित होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांच्याशी संबंधित किस्से अनेक मान्यवरांनी सांगितलं. पण रजनीकांत यांनी केलेलं भाषण मात्र संस्मरणीय ठरलं. रजनीकांत यांच्या भाषणाचा व्हिडिओच सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आपला इगो कसा संपला, याचा किस्साच त्यांनी खुल्या मनाने शेअर केला आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने बंगळुरूत आर्ट ऑफ लिव्हिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रजनीकांत यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण केलं. मला या आश्रमात राहायला आवडतं. या ठिकाणी हिरवळ आहे. झरे आहेत. गायी आहेत. अनेक प्राणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आश्रमातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि हास्य आहे. मला या ठिकाणी यायला सांगितलं गेलं. पण मी आधी कानाडोळा केला. पण नंतर मी दोन दिवस राहायचं ठरवून आलो. पण या ठिकाणचं शांतीमय वातावरण पाहून मी 15 दिवस थांबलो. मी हिमालयात जाऊन आलोय. पण या ठिकाणी आल्यावर माझ्या मनाला प्रचंड शांतता मिळाली आहे. अशी शांतता दुसरीकडे कुठे मिळू शकत नाही, असं रजनीकांत म्हणाले.

आणि इगो…

यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या इगोविषयीही भाष्य केलं. एकेदिवशी गुरुदेवांनी (श्री श्री रविशंकर) मला सत्संगात यायला सांगितलं. मी त्यांनी आधी मना केलं. मी आल्यावर तिथे गोंधळ उडेल, डिस्टर्बन्स होईल, असं सांगितलं. मला वाटलं मी आल्यावर माझे फॅन धावतपळत येतील. रजनी रजनी असा जयघोष करतील. माझी सही घेण्यासाठी धडपड करतील. आणि माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड उडेल. त्यामुळे सत्संगात गोंधळ उडेल असं मला वाटलं. कारण सत्संगात असंख्य तामिळ लोक होते.

पण गुरुदेव म्हणाले, तुम्ही माझ्यासोबत या. काहीच गोंधळ होणार नाही. गुरुदेवांच्या शब्दाला मान देऊन मी त्यांच्यासोबत गेलो. पण तिथे गेल्यानंतर माझा इगोच गळून पडला. कारण सत्संगात 10 ते 15 हजार लोक होते. प्रचंड गर्दी होती. गुरुदेवांभोवती मोठा गराडा पडला होता. पण एकाही व्यक्तीने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. मी बळेबळेच हात उंचावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच माझ्याकडे पाहत नव्हतं. मी असंख्य कार्यक्रमात भाग घेतला. माझ्या भोवतीची गर्दी पाहिली. पण त्या दिवशी गुरुदेवांसोबत असताना सर्व गुरुदेवांकडेच पाहत होते. माझ्याकडे कोणीच पाहत नव्हतं. त्याच क्षणी माझा अहंकार गळून पडाला. मी मनाने डिस्टर्ब झालो, असं रजनीकांत यांनी सांगितलं.

आश्चर्यकारक अनुभव

माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता. आश्चर्यकारक होता. मी मोठमोठे नेते आणि उद्योगपतींना भेटलोय. पण आश्रमातील या अनुभवाने मला आतूनबाहेरून बदलून टाकलं, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर रजनीकांत हसून म्हणाले की, गुरुदेव म्हणाले होते काही डिस्टर्बन्स होणार नाही. पण या घटनेने माझं डोकं मात्र हललं. मेंदूत डिस्टर्बन्स सुरू झाला. रजनीकांत यांनी हा किस्सा ऐकवताच भक्तांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?