AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haryana Flood | गुडघाभर पाण्यात अभिनेत्याकडून पूरग्रस्तांची मदत; नेटकरी म्हणाले ‘हाच खरा सुपरस्टार’

'तुला वाहेगुरू खुश आणि आनंदी ठेवो', असा आशीर्वाद काहींनी या कमेंट्समध्ये रणदीपला दिला आहे. 'बॉलिवूडमधील एकमेव व्यक्ती जी अशा कठीण काळात नेहमीच मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येते', असं एकाने लिहिलं आहे. तर 'खरा सुपरस्टार', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Haryana Flood | गुडघाभर पाण्यात अभिनेत्याकडून पूरग्रस्तांची मदत; नेटकरी म्हणाले 'हाच खरा सुपरस्टार'
Randeep HoodaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2023 | 6:43 PM
Share

हरयाणा | 19 जुलै 2023 : देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा कहर पहायला मिळतोय. अशातच सर्वसामान्यांशिवाय काही सेलिब्रिटीसुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीला धावून येत आहेत. अभिनेता रणदीप हुडाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांसोबत हरयाणातील पूरग्रस्त परिसरातील लोकांची मदत करताना दिसतोय. पुरात अडकलेल्या लोकांना अन्न-पाणी पुरवण्याचं काम रणदीप करतोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने इतरांनाही जमेल तितकी आणि जमेल तशी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

रणदीप खालसा एड फाऊंडेशन या इंटरनॅशनल स्वयंसेवी संस्थेसोबत मिळून काम करतोय. यावेळी त्याची गर्लफ्रेंड लिन लायश्रामनेही मदत केली आहे. रणदीपसोबत मिळून ती सुद्धा पिण्याचं पाणी, दूध आणि इतर आवश्यक गोष्टी गरजूंना देत असल्याचं पहायला मिळतंय. सतत बरसणारा पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे घरातच अडकलेल्या काही लोकांसोबत तो बोलतोय, त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थ पुरवतोय. पावसामुळे अनेकांच्या घरांचं नुकसान झाल्याने काही लोक तात्पुरत्या निवाऱ्याखाली राहत आहेत. त्यांचीही रणदीप मदत करताना दिसतोय.

‘सेवा.. इतरांनाही आवाहन करतो की त्यांनी मदतीचा हात पुढे करावा’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी रणदीपच्या या कार्याचं कौतुक केलं आहे. ‘तुला वाहेगुरू खुश आणि आनंदी ठेवो’, असा आशीर्वाद काहींनी या कमेंट्समध्ये रणदीपला दिला आहे. ‘बॉलिवूडमधील एकमेव व्यक्ती जी अशा कठीण काळात नेहमीच मदतीसाठी सर्वांत आधी पुढे येते’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘खरा सुपरस्टार’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. याआधी अभिनेता सोनू सूदनेही गरजूंची अनेकदा मदत केली आहे. मुंबईतील पावसात अडकलेल्यांचीही त्याने मदत केली.

रणदीपने बॉलिवूडमध्ये कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्याने प्रत्येक भूमिकेतून आपली विशेष छाप सोडली आहे. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश होतो. रणदीपने ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने जिस्म 2, किक, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरबजीत, कॉकटेल यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.