राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीच्या गळ्यात होती या खास व्यक्तीच्या नावाची चेन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीचा लूक फारच आकर्षक होता. तिने नेसलेल्या साडीपासून ते दागिन्यांपर्यंत सर्वांचीच चर्चा झाली. पण राणीच्या गळ्यातील एका सोन्याच्या चेनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कारण त्या चेनमध्ये एका खास व्यक्तीच्या नावाचे इंग्रजी लेटर्स आहेत. कोणत्या व्यक्तीच्या नावची चेन राणीने गळ्यात घातली होती?

अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. यासाठी सर्वांनी तिचं अभिनंदनही केलं. सोहळ्यातील तिच्या लूकची प्रचंड चर्चा झाली. राणीने सोहळ्यात जी साडी नेसली होती तिथपासून ते तिने घातलेल्या नाजूक दागिन्यांपर्यंत सगळ्या गोष्टींनी लक्ष वेधलं होतं. बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवती, राणी मुखर्जी हिला नुकतेच मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
राणीने ब्राऊन रंगाची सुंदर साडी नेसली होती
राणीने ब्राऊन रंगाची सुंदर साडी नेसली होती. साडी सिंपल पण फारच क्लासिक दिसत होती. राणीने त्यावर अगदी साधा ब्लाउज घातला होता. तसेच तिने नेकलेसही परिधान केला होता. अर्थात, तिची हेअर स्टाइलिंग आणि मेकअप अगदी तिच्या साडीला साजेसाच होता.
राणी मुखर्जीचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचा लूक
पुरस्कार सोहळ्यासाठी राणीने चॉकलेट ब्राऊन रंगाची सिल्क साडी नेसली होती. त्या साडीला असणारी सोनेरी जरीची बॉर्डर खूपच सुंदर दिसत होती. राणीने स्कूप नेक असलेला ब्लाउज घातला होता, जो सध्या ट्रेंडिंग आहे. स्कूप नेक फॉर्मल आणि क्लासी लूकसाठी आदर्श आहेत. साडी ब्लाउजसह राणीचे केसही खूपच सुंदर होते. तसेच तिने अगदी सिंपल साधा मेकअप केला होता.

Rani Mukerji Adira name golden chain
दागिन्यांबद्दल चर्चा
तसेच तिने आकर्षक मोत्या-माणिकची नाजूकशी चोकर घातला होता. तसेच तिने लांब कानातले घाकले होते. जे तिच्या लूकचे सौंदर्य अजून वाढवत होते. कानातल्यांसह हा नेकलेसही खूपच आकर्षक दिसत होता. पण या सर्वांपेक्षाही चर्चा झाली ते राणीच्या गळ्यातील एका चेनमुळे. कारण त्या चेनमध्ये एका खास व्यक्तीचे नावाचे लेटर्स होते. या चेनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या चेनमध्ये आहे या खास व्यक्तीचे नाव
या चेनमध्ये तिच्या मुलीचे नाव, आदिराचे नाव होते. आदिरा हे नाव इंग्रजीत लिहिलेले होते. राणीने तिच्या लूकला चेन परिपू्र्ण करत होती. तथापी राणीच्या गळ्यात ही चेन नेहमीच असते. राणी अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या मुलीबाबत नेहमीच बोलताना दिसते.
