रणवीरला लाज वाटली पाहिजे…;अभिनेत्याने ‘माँ चामुंडा’चा अपमान केला, नेटकऱ्यांचा संताप
अभिनेता रणवीर सिंग 'कंतारा' चित्रपटातील एका सीनवर ॲक्ट करताना 'माँ चामुंडा' देवीचा उल्लेख 'भूत' असा केल्याने वादात सापडला आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात घडलेल्या या प्रकारामुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्याला ट्रोल करत आहेत. रणवीरने देवीचा अपमान केल्याचा आरोप करत अनेकांनी त्याला लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे, तर काही जणांनी माफीची मागणी केली आहे.

अभिनेता रणवीर सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आताही त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर सिंग कंतारा या चित्रपटातील एक सीनबद्दल अॅक्ट करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याची चर्चा सुर आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या या अशा वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. त्याने माँ चामुंडाचा अपमान केल्याच्या भावना व्यक्त करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे.
रणवीरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) समारोप समारंभातील आहे. या सोहळ्यात रणवीर सिंग उपस्थित होता . त्याने ‘कांतारा चाप्टर 1′ आणि ऋषभ शेट्टी यांचे कौतुक केले. या कौतुकादरम्यान त्याने कर्नाटकातील तुळु समुदायाची देवी ‘माँ चामुंडा’ हिचा उल्लेख भूत असा केला. त्याच्या वादग्रस्त विधानामुळे आता सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
#RanveerSingh literally called Chavundi Mata a GHOST 😡😡😡
Mimicked her in funny way 🙂↔️🙂↔️🙂↔️🙂↔️
Man is working hard to make things difficult for #Dhurandhar ‼️pic.twitter.com/HeNyi60lu7
— Pan India Review (@PanIndiaReview) November 29, 2025
नेटकरी रणवीरवर का रागावले आहेत?
व्हिडिओमध्ये रणवीर सिंग म्हणतो, “मी तुमचा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर तुमचा अभिनय अद्भुत होता. विशेषतः जेव्हा ती भूत तुमच्या शरीरात येते.” रणवीर पुढे चामुंडा माता ऋषभ शेट्टीमध्ये प्रवेश करते तेव्हाची ती अॅक्टींग करून दाखवतो. पण त्याने ज्या पद्धतीने त्याचे सादरीकरण केले ते पाहून ऋषभही नाईलास्तव हसला, तसेच त्याच्या मागे असलेले लोक खूपच निराश दिसत होते.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी काय म्हटले?
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, “रणवीरने माता चामुंडा यांना भूत म्हटले आहे. त्याने त्यांची खिल्ली उडवली”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “म्हणूनच आजकाल कलाकारांना प्रमोशनपासून दूर ठेवले जाते. ते प्रमोशनपेक्षा जास्त वाद निर्माण करतात.” तर एकाने लिहिले की, “तो माता चामुंडा यांना भूत कसे म्हणू शकतो?” तर अनेकांनी त्याची ही गंमत पाहून “रणवीर सिंगला लाज वाटली पाहिजे.” असं म्हटलं आहे. दरम्यान यावर अजून रणवीरने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
