AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंदीनंतर रणवीर सिंह खरंच बॉलिवूडमध्ये करू शकणार नाही काम? आदेशाचा अर्थ काय?

अभिनेता रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घातली म्हणजे याचा नेमका काय अर्थ होतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रणवीर आता खरंच चित्रपटांमध्ये काम करू शकणार नाही का, याविषयी सविस्तर जाणून घ्या..

बंदीनंतर रणवीर सिंह खरंच बॉलिवूडमध्ये करू शकणार नाही काम? आदेशाचा अर्थ काय?
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2026 | 12:55 PM
Share

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून अभिनेता रणवीर सिंह यशाच्या शिखरावर पोहोचला. मात्र फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटासंदर्भात घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा मोठा फटका रणवीरला बसला आहे. त्याच्यावर थेट फिल्म इंडस्ट्रीत बंदीच घालण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) हा मोठा निर्णय घेतला आहे. शूटिंगच्या अवघ्या तीन आठवडे आधी रणवीरने निर्माते आणि दिग्दर्शकांसोबतच्या मतभेदांमुळे ‘डॉन 3’मधून माघात घेतली. यामुळे चित्रपटाच्या टीमला 45 कोटी रुपयांच नुकसान सोसावं लागलं आहे. याप्रकरणी फरहानने फेडरेशनकडे तक्रार दाखल केल्यानंतर आणि वारंवार चर्चेसाठी बोलावूनही प्रतिक्रिया न दिल्याबद्दल FWICE ने थेट बंदीचे आदेश दिले आहेत. इंडस्ट्रीतल्या कोणत्याच व्यक्तीने त्याच्यासोबत काम करू नये, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे रणवीर आता खरंच कोणत्या चित्रपटात काम करू शकणार नाही का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस

या घटनेमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चा होत आहेत. रणवीर आता बॉलिवूडमध्ये खरंच कोणतंच काम करू शकणार नाही का, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर FWICE ने घातलेल्या या बंदीचा नेमका अर्थ काय, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

FWICE च्या बंदीचा अर्थ काय?

फेडरेशनने घातलेली ही बंदी मुळात संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी एक असहकार्य निर्देश आहे. हा कायदेशीर मनाई हुकूम नाही. म्हणजेच चित्रपटाशी संबंधित कर्मचाऱ्यांना आणि इतरांना शूटिंग किंवा निर्मितीदरम्यान रणवीरसोबत काम न करण्यास सांगितलं आहे. चित्रपटनिर्मिती मोठ्या प्रमाणावर या कामगारांवर अवलंबून असल्याने अशा निर्णयामुळे सध्या सुरू असलेल्या कामात आणि आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यत्यत येऊ शकतो.

रणवीर बॉलिवूडमध्ये काम करू शकत नाही का?

फेडरेशनचा निर्णय म्हणजे ही सरकारने लादलेली बंदी नाही किंवा त्यामुळे एखाद्या कलाकाराला चित्रपट साइन करण्यापासून कायदेशीररित्या रोखलं जात नाही. त्यामुळे याचा अर्था असा नाही की रणवीर सिंह यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाही. मात्र जोपर्यंत तो ‘डॉन 3’चे निर्माते एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत रणवीर भारतात नवीन चित्रपटांचं शूटिंग किंवा निर्मिती करू शकणार नाही.

रणवीरकडे 45 कोटी रुपयांची मागणी

रणवीरला व्यक्तिश: हजर राहून आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी अनेकदा देऊनही त्याने प्रतिसाद दिला नसल्याचा दावा फेडरेशनने केला आहे. तर ‘डॉन 3’ची निर्मिती करणाऱ्या एक्सेल एंटरटेन्मेंटने रणवीरने नुकसान भरपाई म्हणून 45 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल