AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rasika Sunil | रसिका सुनीलने सांगितली ‘त्या’ किसिंग सीनची गोष्ट; म्हणाली “तो खूप घाबरला होता”

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

Rasika Sunil | रसिका सुनीलने सांगितली 'त्या' किसिंग सीनची गोष्ट; म्हणाली तो खूप घाबरला होता
Rasika SunilImage Credit source: Instagram
| Updated on: May 22, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : पडद्यावर किसिंग सीन देणं ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही चित्रपटाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु असे सीन करण्यासाठी सगळेच कलाकार कम्फर्टेबल असतात असं नाही. असाच एक किस्सा ‘फकाट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत घडला. या चित्रपटात सुयोग आणि रसिकाचा एक किसिंग सीन आहे. मात्र तो सीन शूट करण्याआधी सुयोग खूप अनकम्फर्टेबल झाला होता. हा सीन करणं सुयोगला खूपच अवघड जात होतं, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. या सगळ्यात त्याला सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच सांगितला आहे.

किसिंग सीनबद्दल रसिका म्हणाली, ”असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला समजलं, तेव्हा तो खूप घाबरला होता. कारण आधी त्याने असा सीन कधीच केला नव्हता. मी हा सीन कारण्यासाठी कम्फर्टेबल होते. मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं, आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत. त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्नही झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं. अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर किसिंग सीन देण्यासाठी तो तयार झाला आणि हा सीन चित्रित झाला. आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे.”

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या सीनबद्दल रसिकाला तिच्या पतीची प्रतिक्रिया विचारण्यात आली असता ती पुढे म्हणाली, “मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिलास, तुझा नवरा तुला काही बोलला नाही का? त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहीत आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं, याची त्याला पूर्ण कल्पना आहे.”

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहे. हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. येत्या 2 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार
गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,...तर कारवाई होणार.
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी
आव्हाडांच्या वक्तव्यावरून राजकारण तापले; निलंबनाची मागणी.
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ
गॅस तुटवड्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का, तेल-तांदळाच्या दरात वाढ.
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....