रतन टाटांनी अमिताभ बच्चन यांच्यावर पैज लावली अन्…अपयश हाती येता स्वत:ला बॉलिवूडपासून केलं दूर
उद्योगपती रतन टाटांनी रुपेरी पडद्यासाठी काम केले होते. ज्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर विश्वास ठेवून त्यांनी एक पैज लावली होती जे ती हारले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केले.काय होती ती पैज?

बोर्डरूम आणि व्यावसायिक उपक्रमांच्या पलीकडे, रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यावरही काम केले. पण त्यांचा पहिला प्रयत्न त्यांचा शेवटचा ठरला. चला जाणून घेऊया तो कोणता चित्रपट होता…
रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यासाठी काम केले
आज (9 ऑक्टोबर) रतन टाटा यांची पुण्यतिथी आहे. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. तसेच त्यांच्यासारखे उद्योगपती, परोपकारी आणि प्रेरणादायी दुसरा होणे नाही असं ही भावना सर्वांच्याच मनात आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की रतन टाटा यांनी चित्रपटासाठी काम केलं आहे. रतन टाटा यांनी काही काळासाठी रुपेरी पडद्यासाठी काम केले. पण त्यांचा पहिला प्रयत्न त्यांचा शेवटचा ठरला. चला जाणून घेऊया तो कोणता चित्रपट होता ते.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय पैज लावली होती?
रतन टाटा यांनी 2004 मध्ये अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका असलेला “एतबार” हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला एक रोमँटिक सायकॉलॉजिकल थ्रिलर होता. या चित्रपटाची निर्मिती टाटांनी बीएसएस बॅनरखाली केली होती. रतन टाटा यांनी इतर निर्मात्यांसह या प्रकल्पात भाग घेतला. त्यांना विश्वास होता तो अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेबद्दल. कारण त्यांच्या भूमिकेवर जणू रतन टाटा यांनी पैज लावली होती. दुर्देवाने त्यांना यात हार मानावी लागली.
त्यानंतर त्यांनी स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले.
या चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी होते. परंतु बॉक्स ऑफिसवर त्याने फक्त 7.96 कोटींची कमाई केली, ज्यामुळे नक्कीच चित्रपटाचा खर्च वसूल होऊ शकला नाही. रतन टाटांची ही एकमेव निर्मिती होती आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले.
चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात अपयशी
“ऐतबार” ची कथा एका वडील आणि मुलीच्या नात्याभोवती फिरते. अमिताभ बच्चन यांनी डॉ. रणवीर मल्होत्राची भूमिका साकारली आहे, जो त्यांची मुलगी रिया मल्होत्रा (बिपाशा बसू)बाबत खूप पझेसिव्ह असतो आणि तिला तिचा जोडीदार आर्यन त्रिवेदी (जॉन अब्राहम) पासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. या चित्रपटात सस्पेन्स, भावना आणि रोमान्सचे मिश्रण होते, परंतु प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात हा चित्रपट अयशस्वी ठरला.
रतन टाटांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता
रतन टाटांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. कारण त्यांनी टाटा समूहाच्या माध्यमातून ऑटोमोबाईल्स, स्टील आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. जरी “ऐतबार” हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला असला तरी, रतन टाटांच्या बहुमुखी प्रतिभेचा आणि सर्जनशील जोखीम घेण्याच्या त्यांच्या धाडसाचं मात्र कौतुक झालं होतं.
चित्रपटाबद्दल आणखी काही मनोरंजक तथ्ये देखील आहेत जे जाणून आश्चर्य वाटेल. “ऐतबार” हे राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केले होते आणि त्या वेळी त्यातील गाणी मध्यम प्रमाणात लोकप्रिय होती. तथापि, समीक्षकांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा सरासरी मानली.
