Ratris Khel Chale 3 | रघु काकांचा ‘रघु महाराज’ अवतार शेवंता संपवणार? मालिकेत पुन्हा एकदा येणार मोठा ट्विस्ट!

Harshada Bhirvandekar

| Edited By: |

Updated on: Apr 08, 2021 | 9:44 AM

‘तो बघता हा...’ म्हणत प्रत्येक अडचणीवर ‘नारळा’चा उपाय सांगणारे ‘रघु काका’ या पर्वात एका अनोख्या अवतारात दिसले होते. रघु काकांचा आता ‘रघु महाराज’ झाला होता.

Ratris Khel Chale 3 | रघु काकांचा ‘रघु महाराज’ अवतार शेवंता संपवणार? मालिकेत पुन्हा एकदा येणार मोठा ट्विस्ट!
रघु काका

मुंबई : ‘अण्णा नाईक’ परत येणार, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु होती. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच अण्णा नाईकांची क्रेझ होती. प्रत्येकजण अण्णांची आतुरतेने वाट बघत होता. अखेर अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिकेत अण्णांचा दरारा पुन्हा अनुभवायला मिळाला आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले 3’ मध्ये (Ratris Khel Chale 3) काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. सध्या मालिकेत अनेक पात्र बदलली आहेत आणि रोज नवनवीन ट्विस्ट देखील पाहायला मिळत आहेत (Ratris Khel Chale 3 update Raghu kaka will be die in upcoming episode).

‘तो बघता हा…’ म्हणत प्रत्येक अडचणीवर ‘नारळा’चा उपाय सांगणारे ‘रघु काका’ या पर्वात एका अनोख्या अवतारात दिसले होते. रघु काकांचा आता ‘रघु महाराज’ झाला होता. मोठासा मठ बांधून त्यात बसून, आपण कृष्णाचा अवतार असल्याचे सांगत या रघु महाराजांनी भक्तांची लूटमार करण्याचा धंदा सुरु केला होता. याला साथ मिळाली ती अण्णा नाईकांच्या लेकीची अर्थात छायाची! संसार सुख नशिबात नसलेल्या छायाने चक्क रघु काकांशीच लग्नगाठ बांधली.

‘रघु महाराजां’सोबत ‘छाया मा’ म्हणून ती देखील लोकांची लूटमार करू लागली. अशातच पुन्हा एकदा या मालिकेत अभिरामची एंट्री झाली. अभिरामने आल्याबरोबर वाड्याचे आणि हालअपेष्टा सहन करत असलेल्या आपल्या आई आणि भावाचे रुपडे पालटले. मात्र, केवळ रंगरंगोटी केल्याने या वाड्याचे कर्म बदलणार नाही, याची त्याला देखील खात्री आहे.

पाहा नवा प्रोमो :

 (Ratris Khel Chale 3 update Raghu kaka will be die in upcoming episode)

शेवंताची वाड्यावर नजर!

अभिरामची बायको म्हणून या वाड्यात आलेल्या कावेरीवर ‘शेवंता’ने ताबा मिळवला आहे. मल्याळीमध्ये बोलणारी कावेरी अचानक अस्खलित मराठीत बोलू लागली. अचानक शेवंताप्रमाणे नटून, ती घरभर वावरू लागली. तिच्यावर आलेले संकट परतवून लावण्यासाठी माईने विनवण्या करून, रघु काकांना वाड्यात पाचारण केले आहे. माईच्या बोलवण्याचे ‘रघु महाराज’ त्यांच्या छाया मा’सोबत वाड्यात मुक्कामाला आले आहेत. मात्र, आता त्यांचा हा अवतारच संपणार आहे.

शेवंता घेणार का बळी?

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये ‘रघु महाराज’ अर्थात ‘रघु काका’ वाड्याच्या मागील विहिरीच्या बाजूला मृतावस्थेत पडलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे वाड्यात पुन्हा एकदा मृत्यूचे तांडव सुरु होईल का? आणि या फेऱ्यात आता कोणाकोणाचा बळी जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यावेळी देखील पुन्हा एकदा छायाचा संसार मोडणार आहे.

(Ratris Khel Chale 3 update Raghu kaka will be die in upcoming episode)

हेही वाचा :

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!

आईबरोबर अवॉर्ड शो बघायचो, तेव्हा… ‘देवमाणूस’ किरण गायकवाडला स्ट्रगलिंगच्या आठवणी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI