AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai सोबत ब्रेकअपनंतर अत्यंत वाईट होती सलमान खान याची अवस्था; जवळची व्यक्ती दूरावल्याचं दुःख म्हणजे…

Aishwarya Rai - Salman Khan | ऐश्वर्या राय हिच्यासोबत ब्रेकअप, सलमान खान याची वाईट अवस्था, 'तेरे नाम' सिनेमातील एक सीन आणि बरंच काही... बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितलं ब्रेकअपनंतर कशी झाली होती सलमान खान याची अवस्था... सत्य अखेर समोर..

Aishwarya Rai सोबत ब्रेकअपनंतर अत्यंत वाईट होती सलमान खान याची अवस्था; जवळची व्यक्ती दूरावल्याचं दुःख म्हणजे...
| Updated on: Oct 07, 2023 | 3:07 PM
Share

मुंबई | 07 सप्टेंबर 2023 | अभिनेता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. एक काळ असा होता जेव्हा, सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा होती. ‘हम दिल दे चुके’ सिनेमातून दोघे चाहत्यांच्या भेटील आले. सिनेमा हीट झाल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. रिल लाईफमध्येच नाही तर, रियल लाईफमध्ये देखील सलमान आणि ऐश्वर्या यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आज सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील दोघांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल भोजपुरी अभिनेता रवी किशन याने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सलमान खान याची दुसरी बाजू समोर आली आहे. रवी किशन सध्या ‘मिशन रानीगंज’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. अशात, सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्याने सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

ऐश्वर्या राय हिच्यासोबत ब्रेकअप सलमान खान याची अवस्था कशी झाली होती, याबद्दल रवी किशन याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ऐश्वर्या राय हिच्यासोबत ब्रेकअप सलमान खान प्रचंड दुःखावला होता. ‘तेरे नाम’ सिनेमा दरम्यान सलमान याचं ब्रेकअप झालं होतं. तेव्हा अभिनेता शांत शांत असायचा… ज्यामुळे सलमान याच्या अभिनयात जिवंतपणा आला होता…’

‘दुःखी आणि भावनात्मक सीनच्या वेळी तर सलमान खान याचं आभिनय फार वेदना देणारं होतं…’असं देखील अभिनेता म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवी किशन याच्या वक्तव्याची आणि सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. २००२ मध्ये सलमान – ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं. २००३ साली ‘तेरे नाम’ सिनेमा प्रदर्शित झाला होता.

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. आराध्या देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. आराध्या हिचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. सलमान खान आज देखील एकटाच आहे. अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना