अमिताभ बच्चन यांचा जळफळाट… रेखा यांना पाहिल्यानंतर सर्वांच्या उंचावल्या भुवया… Video पाहून म्हणाल…
Rekha New Video : सोशल मीडियावर सध्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही रेखा यांचं कौतुक कराल... आजही रेखा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Rekha New Video : बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील चाहत्यांमध्ये रेखा यांची असलेली क्रेझ दिसून येते… आता देखील रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 71 व्या वर्षी देखील रेखा प्रचंड सुंदर दिसतात. आजही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. तरुणींना मागे टाकेल असे लूक रेखा यांचे असतात. आता देखील वाढदिवसाच्या पार्टीसाठी रेखा यांनी खास लूक कॅरी केलेला.
सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या डान्सींग क्विन हेलन यांनी नुकताच 87 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. यावेळी हेलन यांच्या कुटुंबियांसोबत अनेक जवळचे मित्रमंडळी देखील वाढदिवसासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले. यावेळी अभिनेत्री रेखा यांनी देखील हजेरी लावली आणि आपल्या खास अंदाजाचे कार्यक्रमाची शोभा वाढवली.
View this post on Instagram
काळ्या रंगाचा जम्पसूट आणि निळ्या रंगाच्या डेनिम जॅकेटमध्ये रेखा यांनी हटके अंदाजाच एन्ट्री केली.. यावेळी रेखा यांनी पापाराझींनी पोज देखील दिल्या. एवढंच नाही तर, एका पापाराझीचा कॅमेऱ्या घेऊन त्यांचा फोटो देखील काढला… सध्या रेखा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि व्हिडीओवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
रेखा यांचा हाच अंदाज चाहत्यांना देखील प्रचंड आवडतो… रेखा यांच्या व्हिडीओवर चाहले लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. रेखा यांच्या व्हिडीओ कमेंट करत एक चाहता म्हणाला, ‘क्वीन नेहमी प्रमाणे सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार करत आहे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सुपर एनर्जेटिक…, मला असं वाटतं की मी या वयात आल्यांनंतर अशी उर्जा माझ्यात असली पाहिजे…’, एक नेटकरी विनोदी अंदाजात कमेंट करत म्हणाला, ‘पाहून अमिताभ बच्चन यांचा जळफळाट होत असेल…’
रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या बद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. रेखा यांनी अनेकदा बिग बी यांच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अमिताभ बच्चन कायम यावर मौन बाळगून असतात.
