AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty : ‘सबकुछ भुला दिया’, रिया चक्रवर्तीचा भूतकाळाला बाय-बाय, भविष्याचे वेध

आता हळूहळू रिया तिचे आयुष्य पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. (Rhea Chakraborty: 'Forget everything', Rhea Chakraborty's bye-bye to the past, looking to the future)

Rhea Chakraborty : 'सबकुछ भुला दिया', रिया चक्रवर्तीचा भूतकाळाला बाय-बाय, भविष्याचे वेध
| Updated on: Apr 11, 2021 | 2:26 PM
Share

मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीनं (Rhea Chakraborty) सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा तिनं चाहत्यांना सांगितलं होतं की ती आणि सुशांत रिलेशनशीपमध्ये होते. त्याच्या मृत्यूनंतर रियाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. इतकंच नाही तर सुशांत प्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आलं तेव्हा या प्रकरणात रियालाही अटक करण्यात आली होती. त्यावेळी रियाला प्रचंड वाईट वागणुत देण्यात आली होती. यानंतर रियाने स्वत:ला घरात कैद करुन ठेवलं होतं. सोशल मीडियापासूनही ती लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया तिचे आयुष्य पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. (Rhea Chakraborty: ‘Forget everything’, Rhea Chakraborty’s bye-bye to the past, looking to the future)

सोशल मीडियावर सक्रिय

ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे आणि बर्‍याच पोस्ट शेअर करतेय. तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये एक वेगळा मॅसेज आहे. रियानं नुकतंच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये ती रवींद्रनाथ टागोर यांचं पुस्तक वाचत आहे. रियाने हा फोटो शेअर केला आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांची एक ओळही कॅप्शनमध्ये लिहिली आहे.

बघा रियाची नवी पोस्ट (See Rhea’s new post)

रियाची ही पोस्ट वाचल्यानंतर असं वाटतंय की ती आता सुशांतच्या  दु:खातून बाहेर पडतेय आणि पुन्हा एकदा आपलं आयुष्य एका नव्या मार्गाने जगण्यास सुरुवात करत आहे.

साकीब सलीमसोबत स्पॉट

अलीकडेच रिया चक्रवर्ती साकीब सलीमसोबत दिसली. दोघांना अलीबागहून परत येताना स्पॉट केलं गेलं. अलीबागमध्ये दोघांनी एकत्र पार्टी केल्याची बातमी आहे. मनीष मल्होत्रा ​​देखील या दोघांसोबत होता. रिया आणि साकीबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अमिताभ बच्चनसोबत झळकणार!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती लवकरच चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच चेहर्‍याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, रियाच्या चाहत्यांनी तिची एक झलक पाहायला मिळाली आहे.

गूढ-थ्रिलर चित्रपट

‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे.

संबंधित बातम्या

Photo : ऐश्वर्या रायची सेम टू सेम इरानी कॉपी पाहिलीय?, फोटो पाहाल तर म्हणाल, ‘ऐसा तो हमने देखा नही था पहले’

Photo : ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर स्पृहाची अप्रतिम झलक, सुंदर फोटो शेअर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.