SSR Case | एनसीबीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर रिया थेट वांद्रे पोलिसांत, सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार

एनसीबीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर रियाने थेट वांद्रे पोलीस स्टेशन गाठले.

SSR Case | एनसीबीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर रिया थेट वांद्रे पोलिसांत, सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार
Nupur Chilkulwar

|

Sep 07, 2020 | 10:59 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty In Bandra Police Station) पोलीस स्टेशन गाठलं. रिया चक्रवर्ती गेल्या तीन तासांपासून वांद्रे पोलीस ठाण्यात आहेत (Rhea Chakraborty In Bandra Police Station).

एनसीबीच्या 8 तासांच्या चौकशीनंतर रियाने थेट वांद्रे पोलीस स्टेशन गाठले. रिया सुशांत सिंहची बहीण प्रियांका सिंहविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी वांद्रे पोलीस ठाण्यात आली. रियाचा आरोप आहे की, प्रियांका सिंहने सुशांत सिंहसाठी औषधांची स्लिप बनवली होती. ती चुकीची आहे, बनावट स्लिप आहे.

रिया उद्या सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीशी सामना करणार आहे. एनसीबी रियाला उद्या तिसऱ्यांदा चौकशी करणार आहे आणि उद्या चौकशीनंतर रियाला एनसीबीच्या पथकाकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रियाने 8 तासांच्या चौकशीनंतर थेट वेळ न गमावता तक्रार देण्यासाठी एनसीबी कार्यालयातून थेट वांद्रे पोलिस ठाणे गाठले.

रियाला तिच्या बचावाची एकही संधी सोडण्याची इच्छा नाही. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर बरेच आरोप केले आहेत आणि रिया सुशांतच्या कुटूंबाने केलेले आरोप नाकारण्यासाठी आली आहे. पण आज रियाला संधी मिळताच तिने तातडीने एनसीबी कार्यालयातून वांद्रे पोलीस स्टेशन गाठले.

Rhea Chakraborty In Bandra Police Station

संबंधित बातम्या :

ड्रग्जप्रकरणी शौविक, सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी, रियाच्या अटकेची दाट शक्यता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें