AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जेनेलियाने दाखवले लग्नाचे फोटो, रितेश देशमुखला आठवली दुःखद गझल, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडचं क्युट कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia D’Souza) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Video | जेनेलियाने दाखवले लग्नाचे फोटो, रितेश देशमुखला आठवली दुःखद गझल, पाहा व्हिडीओ
रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख
| Edited By: | Updated on: Apr 04, 2021 | 10:13 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचं क्युट कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia D’Souza) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ही जोडी सोशल मीडियावर त्यांचे धमाल व्हिडीओ शेअर करत असते. त्यांच्या या व्हिडीओंमधून त्यांची धमाल-मस्ती पाहायला मिळते. रितेश आणि जेनेलियाची ही केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. नुकताच रितेशने असाच एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे (Riteish Deshmukh and Genelia Dsouza new video gone viral).

या व्हिडीओमध्ये जेनेलिया रितेशला मोबाईलवर फोटो दाखवून स्माईल करताना दिसत आहे, तर रितेश एक जुनी गझल आठवत आहेत.

लग्नाचे फोटो पाहताच उतरला रितेशचा चेहरा

रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जेनेलिया देखील त्याच्यासोबत दिसली आहे. या व्हिडीओमध्ये जेनेलिया रितेशच्या लग्नाचे फोटो दाखवते, पण हे फोटो पाहून रितेशचा चेहरा धडकन उतरताना दिसला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

पाहा ‘हा’ व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 (Riteish Deshmukh and Genelia Dsouza new video gone viral)

जेनेलियाने रितेशला लगावले ठोसे

रितेश आणि जेनेलियाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओत, एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान एकत्र गेलेले रितेश जेनेलिया हे माध्यमांसाठी फोटो पोझ देत असतात. मात्र, तितक्यात तिथे आणखी एक अभिनेत्री येते. तिला पाहून रितेश तिच्या जवळ जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो. इतकेच नाही तर तिच्या हातांची चुंबने देखील घेतो. हे पाहून जळफळाट झालेल्या जेनेलियाचे हावभाव बदलतात. हा व्हिडीओ खूप जुना असून, माध्यमांनी जेनेलियाच्या या अदा अचूक टिपल्या होत्या.

रितेश-जेनेलियाचा हा व्हिडीओ खूप जुना असला तरी, अजूनही सोशल मीडियावर तितकाच पहिला जातो. याच संधीचा फायदा घेत जेनेलियाने त्या जुन्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणारा एक मजेशीर व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार सोहळ्यातील तो चर्चित व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओनंतर सध्या दुखापतग्रस्त असलेल्या जेनेलियाचा रागावलेला चेहरा समोर येतो. ज्यात ती जोरदार ठोसे लगावताना दिसते. त्यानंतर समोर सोफ्यावर रितेश घायाळ होऊन पडलेला दिसतो. तर, व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘तेरा नाम लिया… तुझे याद किया…’ हे गाणे वाजत आहे. अर्थात रितेश आणि जेनेलियाची ही भांडण केवळ मनोरंजनाचा एक भाग होता. हा मजेशीर व्हिडीओ जेनेलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

(Riteish Deshmukh and Genelia Dsouza new video gone viral)

हेही वाचा :

Vicky Kaushal  | विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक!

Video | बॉलिवूड पदार्पणापूर्वीच शनाया कपूरने उडवली चाहत्यांची झोप, पाहा तिचा जबरदस्त ‘बेली डान्स’

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.