AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील रितेश देशमुखचा सेटवरील फर्स्ट लूक; पाहा महाराजांच्या वेशात कसा दिसतोय रितेश?

रितेश देशमुख दिग्दर्शित "राजा शिवाजी" चित्रपटातील त्याचा पहिला लूक समोर आला आहे. रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. "वेड" च्या यशानंतर रितेश यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटातील रितेश देशमुखचा सेटवरील फर्स्ट लूक; पाहा महाराजांच्या वेशात कसा दिसतोय रितेश?
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 1:38 PM

अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानंतर आता चर्चा होतेय ती अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची. रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रितेश महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखनेच सांभाळली आहे.

‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट 

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा मराठी चित्रपट ‘वेड’ हा सुपरहिट ठरला. प्रेक्षकांच्या अक्षरश: या चित्रपटाला उचलून घेतलं. या चित्रपटाला ओटीटीवरही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहे. या चित्रपटाबाबत अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

चित्रपटातील रितेश देशमुखचा लूक समोर 

अभिनेता रितेश देशमुखचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याच्या विरुद्ध भूमिकेत साइन केलं आहे. दरम्यान चित्रपटाचे शुटींग जोरदार सुरु असून रितेशचा एक लूकचा फोटोही समोर आला आहे. हा फोटो शुटींगदरम्यानचा असून रितेश महाराजांच्या वेशात दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

हे अभिनेते साकारणार मुघलांची भूमिका

चित्रपटात अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली असून ते या चित्रपटात निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहेत. एका रिपोर्टनुसार, हे तिनही अभिनेते मुघलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा केली होती.

राजा शिवाजी चित्रपटाचं शुटिंग जोरात सुरु

‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ प्रक्षकांना आता रितेशच्या या चित्रपटाच्या ट्रेलरलची आणि रिलीज डेटची उत्सुकता लागून राहिली आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.