खरंच की काय? त्या ड्रग्ज पार्टीत अक्षय कुमारचा मुलगाही होता? ट्विंकल खन्नाच्याच ‘त्या’ फोटोची चर्चा

स्टार किड्सना ट्रोल केलं जातंय. अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियादेखील या ड्रग्ज पार्टीमध्ये सामील होता, असा दावा नेटकरी आहेत. तशा काही पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

खरंच की काय? त्या ड्रग्ज पार्टीत अक्षय कुमारचा मुलगाही होता? ट्विंकल खन्नाच्याच 'त्या' फोटोची चर्चा
aarav bhatia
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 05, 2021 | 7:50 PM

मुंबई : क्रूझ पार्टी तसेच ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव आल्यानंतर बॉलिवूड तसेच देशभरात खळबळ उडाली आहे. सध्या आर्यनसह इतर तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूड तसेच स्टार किड्सना ट्रोल केलं जातंय. अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियादेखील या ड्रग्ज पार्टीमध्ये सामील होता, असा दावा नेटकरी करत आहेत. तशा काही पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

क्रूझ ड्रग्ज पार्टीत अक्षय कुमारचा मुलगा असल्याची चर्चा

आर्यन खानला एनसीबीने अटक केल्यानंतर नेटकरी बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या मुलांना ट्रोल करत आहेत. वेगवेगळे मीम्स तसेच फोटो आणि ट्विट शेअर केले जातायत. यामध्ये अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियादेखील सुटला नाही. आरव हा आर्यन खानसोबत क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये सामील होता असं नेटकरी म्हणत आहेत. तसा दावा करण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. या सर्व प्रकरणावर अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच अप्रत्यक्षपणे स्पष्टीकरण दिलं आहे.

आरव भाटिया सध्या कुठे आहे ?

सोशल मीडियावर आर्यन खान तसेच इतर स्टार किड्सबाबत मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरु असताना आरव भाटियासुद्धा यातून सुटला नाही. त्याचे नाव ड्रग्ज पार्टीशी जोडले गेल्यानंतर तो नेमका कुठे आहे, हा प्रश्न विचारला जात होता. मात्र या सर्व चर्चांवर पडदा पाडण्याचा प्रयत्न ट्विंकल खन्नाने केला आहे. आरव सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत विदेशात फिरायला गेला आहे. ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिचा मुलगा म्हणजेच आरव भाटियासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे आरव ट्विंकलच्या कपाळाला प्रेमाने किस करत असल्याचे या फोटोमध्ये दिसतंय. हा फोटो अपलोड करुन ट्विंकलने माझ्या मुलाचा ड्रग्ज पार्टीशी कोणताही संबंध नाही असे सांगण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला आहे.

13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस जप्त 

दरम्यान, आर्यन खानने एनसीबीने अटक केल्यानंतर त्याच्या कोठडीत सात ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या काळात आर्यनची कसून चौकशी केली जात आहे. तसेच आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 लाख 33 हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर ड्रग्ज प्रकरणात सापडले आहेत.

इतर बातम्या :

zaira wasim | बॉलिवूडमधून एक्झिट घेतल्यानंतर झायरा वसीमने पहिल्यांदाच शेअर केला फोटो, पाहा तिचा नवा लूक

Video | छोट्या मुलाने शहनाज गिलला प्रश्न विचारले, समोर आलेले उत्तर पाहून ‘Sidnaaz’चे चाहते भावूक झाले!

Aryan Khan Drug Case: कुणी मेकअप आर्टिस्ट तर कुणी शिक्षक, पाहा आर्यन खानसोबत आणखी कोणकोण अटकेत?

(rumors spread on social media akshay kumar son aarav bhatia present in cruise rave party with aryan khan twinkle khanna share photo)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें