AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayaan : रणबीर-यश करतायत ‘रामायण’चं US प्रमोशन, साई पल्लवी मात्र गायब; चर्चेला उधाण

Ramayaan : नितेश तिवारीचा 'रामायण' चित्रपट बराच चर्चेत आहे. फिल्मच्या कास्टकडून सातत्याने प्रमोशन सुरू आहे. पण एका इव्हेंटमध्ये साई पल्लवी दिसली नाही, त्यावरून चाहत्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

Ramayaan :  रणबीर-यश करतायत 'रामायण’चं US प्रमोशन, साई पल्लवी मात्र गायब; चर्चेला उधाण
Image Credit source: TV9
| Updated on: Sep 18, 2026 | 7:22 PM
Share

नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट घोषित झाल्यापासूनच सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. फिल्मच्या कास्टिंगवरून वाद झाला त्यानंतर या चित्रपटाच्या प्रमोशनपर्यंत विविध अटकळी व्यक्त झाल्या, त्यामुळे रामायण ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या चित्रपटाची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकतेच रामायणमधील काही अभिनेते इंटरनॅशनल प्रमोशन कँपेनसाठी हजर होते. मात्र यादरम्यान, चित्रपटात सीतमाईची भूमिका साकारणार, प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी मात्र दिसली नाही. त्यावरूनच आता विविध चर्चा सुरू झाल्या असून Redditवर युजर्सनी सवाल उपस्थित केलेत. साई पल्लवी प्रमोशन मधून कुठे गायब झाली, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

खरंतर, भारत मंडपम मध्ये झालेल्या रामायणच्या इव्हेंटमध्ये साई पल्लवी सहभागी झाली होती. पण जेव्हा रणबीर कपूर, यश, नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी हेसगळे परदेशात या चित्रपटाचं प्रमोशन करण्यास गेले, तेव्हा मात्र साई पल्लवी कुठेच दिसली नाही. रणबीर कपूरवर जास्त फोकस रहावा म्हणून तिला जाणूनबुजून या प्रमोशनपासून दूर ठेवलं जातयं का, असा सवाल काही नेटकऱ्यांनी विचारला. कदाचित ती मणिरत्नम यांच्या इंजी वेल्लम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असेल, असा अंदाज काही लोकांनी वर्तवला.

चाहत्यांचे विविध सवाल

साई पल्लवी या चित्रपटच्या प्रमोशनमध्ये फारशी का दिसत नाही, असं एका रेडिट (Reddit) युजरने विचारं. तर त्यावर एकाने प्रतिक्रिया दिली, “काळजी करू नका, जर चित्रपट फ्लॉप झाला, तर त्याचं सर्व श्रेय सईलाच मिळेल.” तर दुसऱ्या एका युजरने या परिस्थितीची तुलना शर्वरीच्या ‘अल्फा’ (Alpha) या चित्रपटाशी केली; दोघीही महिला स्टार्स असूनही, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीचा अधिक वापर केला जातो, असं त्याने लिहीलं. दरम्यान, एका युजरने गमतीने लिहिलं की, ” रामजीच (रणबीर कपूर) सर्व श्रेय घेणार आहेत.”

या सगळ्या दरम्यान काही लोकांनी साई पल्लवीच्या समर्थनार्थही भूमिका घेतली. ती सध्या मणी रत्नम यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, दर वेळेस इतका द्वेष का ? असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला. तर , मणी रत्नम दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे साई पल्लवी कदाचित व्यस्त असू शकते आणि ‘रामायण’च्या भारतातील प्रमोशनसाठी ती नंतर इतर कलाकारांसोबत सामील होऊ शकते असा अंदाज आणखी एकाने वर्तवला.

याच दरम्यान आणखी एकाने साई पल्लवीच्या अनुपस्थितीबाबत मजेत लिहीलं की, “कारण रावणाने सीतेचे अपहरण केलं आहे – आणखी काय असणार?”. तर काही लोकांनी असाही अंदाज लावला की, आपला लूक किंवा सार्वजनिक उपस्थितीबाबत होणारी टीका टाळण्यासाठी साई पल्लवी कदाचित या प्रमोशनपासून दूर राहत असावी.

कुठे गायब झाली साई पल्लवी ?

सध्या तरी, या प्रश्नांबाबत साई पल्लवी किंवा ‘रामायण’च्या निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ती सध्या मणी रत्नम यांच्या ‘इंगी वेल्लम’ (Ingi Vellam) या चित्रपटाचे शूटिंग विजय सेतुपतीसोबत करत आहे. एवढंच नव्हे, तर सुमारे महिन्याभरापूर्वी अशीही बातमी आली होती की, तिने राजकुमार पेरियासामी यांच्या ‘ओएम’ (OM) या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केलं आहे; या चित्रपटात धनुष, ममूटी आणि श्रीलीला यांच्याही भूमिका आहेत. ण प्रोशनमधून साई पल्लवी गायब असल्याने चाहते मात्र चिंतीत आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं