AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar : मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, युवा चेहऱ्याची कॅबिनेटमध्ये होणार एन्ट्री? भाजप आमदाराने सांगितली मनातली इच्छा

मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मैथिली ठाकूर यांच्या विधानाने युवा चेहऱ्याची कॅबिनेटमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Bihar : मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, युवा चेहऱ्याची कॅबिनेटमध्ये होणार एन्ट्री? भाजप आमदाराने सांगितली मनातली इच्छा
bjp news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 6:49 PM
Share

बिहारच्या भाजप आमदार मैथिली ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. एका मुलाखतीत बिहारच्या राजकारणावर मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी मंत्रि‍पदावर मोठं भाष्य केलं आहे. मी फक्त मंत्रि‍पदावर समाधान मान्य करणारी नसून मी खूप महत्वाकांक्षी आहे, असे वक्तव्य मैथिली ठाकूर यांनी केलं आहे. मैथिली ठाकूर यांच्या विधानाने बिहारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांनी त्यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं. मंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर भाजप आमदार म्हणाल्या, ‘मला आमदार होण्याची देखील इच्छा नव्हती. पण पक्ष मला जे काम देईल, ते मी पूर्ण करेन’. तर पुढे म्हणाल्या, मी खूप महत्वाकांक्षी असून मंत्रि‍पदावर समाधानी राहीन का? असा सवाल देखील मैथिली ठाकूर यांनी उपस्थित केला. मैथिली ठाकूर यांनी निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवरही भाष्य केलं. ठाकूर म्हणाल्या, ‘निवडणूक लढणे कधीच सोपे नसते. त्यात आजच्या युगात सोशल मीडियामुळे (Social Media) आणखी आव्हानात्मक बनलं आहे’. काही दिवसांपूर्वी मैथिली यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर त्यांनी बिहार आणि खाद्यसंस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यामुळे मैथिली ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

भाष्य करताना संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवणे गरजेचे – मैथिली ठाकूर  

तत्पूर्वी, मैथिली ठाकूर यांनी राणी पद्मावतीवर अभिनेत्री स्वरा भास्करने भाष्य केलं होतं. स्वरा भास्करच्या विधानावरही मैथिली ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या वक्तव्याने एक स्त्री म्हणून दु:ख झालं का, असा प्रश्न विचारल्यावर मैथिली यांनी म्हटलं की, भारतात विविध धर्म आणि श्रद्धांचा आदर केला जातो. त्यामुळे कोणत्याही विषयावर भाष्य करताना संवेदनशीलता आणि समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलं. कोणाच्याही वैयक्तिक श्रद्धा किंवा धर्माला दुखावणारी टिप्पणी करू नये, असे त्यांनी म्हटलं.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं