AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : दादांची पोकळी…. पुणे फेस्टिव्हलच्या भाषणात उपमुख्ममंत्री सुनेत्रा पवार भावुक, नेमकं काय म्हणाल्या?

पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या. पुण्याच्या विकासासोबतच शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी काम करणाऱ्या अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. पण त्यांनी स्वतःला सावरलं.

Sunetra Pawar : दादांची पोकळी.... पुणे फेस्टिव्हलच्या भाषणात उपमुख्ममंत्री सुनेत्रा पवार भावुक, नेमकं काय म्हणाल्या?
Sunetra pawar speechImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 6:49 PM
Share

पुणे फेस्टिव्हलला पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या. आदरणीय दागा या फेस्टिव्हलच्या उद्घाटनाला आले होते. तेव्हा मी पण त्यांच्यासोबत आले होते. त्यांनी पुण्याता विकास करताना सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी त्यांनी काम केलं. पण आज ते आपल्यात नाहीत मात्र ही पोकळी कायम जाणवत राहणार आहे. पण पुणेकरांचं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे, असं म्हणताना सुनेत्रा पवार भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अनेकदा भावुक होतात. लोकांच्या भेटी घेताना किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये बोलताना त्यांना दादांच्या आठवणीत भावुक व्हायला होतं. त्यामुळे आताही सुनेत्रा पवार चर्चेत आल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी काम करताना दादांनी पुणेकरांच्या सुखदुखामध्ये सहभागी होणं. पुण्याच्या विकासासाठी सातत्याने काम करणं ही त्यांची कार्यपद्धती होती. आज ते आपल्यात नाहीत. त्यांची पोकळी जाणवत राहणार पण पुणेकरांच्या हितासाठी काम करत राहण हीच त्यांना आपली आदरांजली असेल. कोणताही सांस्कृतिक महोत्सव सुरु करण सोपं असतं पण तो सातत्यानं सुरु ठेवणं कठीण असतं असंही त्यांनी सांगितलं

दरम्यान, 38 वे पुणे फेस्टिव्हलचे आयोजन पुण्यात करण्यात आलेले आहे. यावेळी बोलताना पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मोठ्या कलाकारांबरोबरच नवीन कलाकारांना व्यासपीठ देणं, विविध स्पर्धा, आंतरराष्ट्रीय सहभाग हे पुणे फेस्टिव्हलचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा की आता पुण्याची संस्कृती फक्त पुण्याची राहिली नाही तर ती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. पुणे शहर या जागतिक संवादाचा एक सांस्कृतिक दुवा आहे. कलेला भाषा, प्रांत याच्या सीमा नसतात. आपण सर्वजण मिळून ,सामाजिक ऐक्याचा हात पुढे न्यायचा आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून हीच संस्कृती जगभर पोहोचू दे. हीच गणारायांचरणी प्रार्थना करते, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं