Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानच्या ऑपरेशसाठी लाखोंचा खर्च, विमा कंपनीकडे कॅशलेस उपचाराची मागणी, रक्कम अखेर समोर

Saif Ali khan Operation Bills: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सहा वार करण्यात आले होते. तर चाकूचा एक तुकडा त्याच्या शरीरात रूतून बसला होता. सर्जरीनंतर हा तुकडा काढण्यात आला आहे. सैफ अली खानने निवा बूपाची हेल्थ पॉलिसी घेतली होती. त्याच्यावर कॅशलेस उपचार सुरू असून या कंपनीने उपचाराची काही रक्कम मंजूरही केली आहे.

सैफ अली खानच्या ऑपरेशसाठी लाखोंचा खर्च, विमा कंपनीकडे कॅशलेस उपचाराची मागणी, रक्कम अखेर समोर
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 1:53 PM

Saif Ali khan Operation Bills: अभिनेता सैफ अली खान मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल आहे. एका हल्लेखोराने अभित्यानेवर चाकूने सहा वार केले आहे. हाणामारीमध्ये अभिनेत्यावर झालेले दोन वार गंभीर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सैफच्या मणक्यात हल्लेखोराने वार केल्यानंतर चाकूचा 2.5 इंचचा तुकडा त्याच्या शरीरात राहिला. अशात शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी चाकूचा तुकडा काढला आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सैफ सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. हल्ल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेसाठी सैफला मोठी किंमत मोजावी लगणार आहे. रुग्णालयाचं बिल देखील समोर आलं आहे. अभिनेत्याने आरोग्य विम्याच्या माध्यमातून कॅशलेस उपचार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी कॅशलेस उपचारासाठी विमा कंपनीशी खान कुटुंबियांचं बोलणं झालं होतं. अभिनेत्याला शस्त्रक्रियेसाठी एका रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत सैफवर उपचार होणार आहे. 5 दिवस अभिनेता रुग्णालयात राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या उपचारासाठी 35 लाख 98 हजार 700 रुपये खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील 25 लाख रुपये विमा कंपनीने मंजूर केले आहे. तर राहिलेला खर्च खुद्द सैफ अली खान याला स्वखर्चातून करावा लागणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले डॉ. नितिन डांगे?

लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे शुक्रवारी म्हणाले, ‘सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…’ अभिनेत्याला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.

अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.