AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैराट’ फेम अर्चीने कोणावर व्यक्त केली नाराजी? म्हणाली, ‘तो एक वेळगळाच स्ट्रगल असतो कारण…’

'सैराट' सिनेमातून एक रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने स्वतःच्या स्ट्रगलबद्दल मोठा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर, काम मिळत नसल्याची खंत देखील अभिनेत्रीने बोलून दाखवली... जाणून नेमकं काय म्हणाली रिंकू?

'सैराट' फेम अर्चीने कोणावर व्यक्त केली नाराजी? म्हणाली, 'तो एक वेळगळाच स्ट्रगल असतो कारण...'
Rinku Rajguru
| Updated on: Mar 31, 2026 | 8:44 AM
Share

‘सैराट’ सिनेमातील “काय बघतो रं?”, “तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही का?”, आणि “…मी इथून थेट शेतात चालली” हे डायलॉग आजही चाहत्यांच्या तोंडावर आहेत. सिनेमात अर्ची ही भूमिका साकारत एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रिंकू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री तिच्या स्ट्रगलबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांना असं वाटतं की, जे काही मिळालं आहे, ते सहज मिळालं आहे, पण सहज मिळाल्यानंतर हाताळणं देखील तितकंच कठीण असतं…’, सध्या सर्वत्र रिंकू हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

एका मुलाखतीत रिंकू म्हणाली, ‘सैराट सिनेमा हीट ठरला, पण त्यानंतर मी चांगल्या कलाकारांसोबत काम का केलं नाही? इंडस्ट्रीमध्ये चांगले दिग्दर्शक आहेत, पण त्यांनी मला कधीच काम दिलं नाही… असं का? असा प्रश्न मला कायम पडत असतो… ऑडिशन्स मी आज देखील देत आहे… त्यामुळे हे सगळं टिकवून कसं ठेऊ, हा देखील वेगळाच स्ट्रगल आहे… त्यामुळे स्ट्रगल कुणालाच चुकत नाही… लोकांना असं वाटतं मला सगळं काही सहज मिळालेलं आहे. पण सहज मिळाल्यानंतर हाताळणं देखील तितकंच कठीण असतं…’ असं देखील रिंकू म्हणाली.

‘मला असं म्हणायचं आहे की, तुम्हा पायऱ्या चढत – चढत वर जाता… तुम्हाला थेट वर नेऊन ठेवलं जातं. आणि तेथून संपूर्ण जग दिसतं. पण अशा परिस्थितीत कळत नाही की, नेमकं काय करायचं आहे… तसंच मी अनुभवातून शिकले आहे… मला असं नाही वाटत की कोणी आहे. मी आजही कोणी भेटलं तर सांगते, काही काम असेल तर मला सांगा… सगळ्यांना मी ओळखते. पण माझ्याकडे काम घेऊन कोणीच आलं नाही. काहींना तर असं वाटतं की, मी एकाच प्रकारच्या भूमिका करते… त्यामुळे ज्याला ज्याच्यासोबत काम करायचं आहे, ते त्यांच्यासोबतच काम करतात…’, असं देखील रिंकू म्हणाली…

रिंकू हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’ सिनेमानंतर अभिनेत्री कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘कागर’, ‘झुंड’, ‘झिम्मा 2’ यांसारख्या सिनेमात दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. रिंकू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. रिंकू तिच्या नव्या सिनेमाच्या अपडेट्स देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रिंकू कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून
सरकारने आश्वासन पाळलं नाही तर... मनोज जरांगे पाटलांचे हॉस्पिटलमधून.