AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : बॉक्स ऑफिसवर ‘सैय्यारा’चं वादळ; 2 दिवसांत तब्बल 18 चित्रपटांना चारली धूळ

अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सैय्यारा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक नवं वादळ आणलं आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

Saiyaara : बॉक्स ऑफिसवर 'सैय्यारा'चं वादळ; 2 दिवसांत तब्बल 18 चित्रपटांना चारली धूळ
saiyaaraImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 20, 2025 | 9:48 AM
Share

अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं ‘सैय्यारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अहानच्या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनीत पड्डा या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहित सुरीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 2025 मधील अनेक चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.

Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा 45 कोटींवर पोहोचला आहे. ज्या गतीने या चित्रपटाची कमाई सुरू आहे, ते पाहून पहिल्याच वीकेंडच्या कमाईचा आकडा 75 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

‘सैय्यारा’ने पहिल्या 2 दिवसांत कोणकोणत्या चित्रपटांना टाकलं मागे?

  • आझाद – 22 कोटी रुपये
  • केसरी वीर – 1.88 कोटी रुपये
  • आंखो की गुस्ताखियाँ – 1.74 कोटी रुपये
  • मेरे हसबंड की बिवी – 12.25 कोटी रुपये
  • द भूतनी – 12.52 कोटी रुपये
  • लवयापा – 7.69 कोटी रुपये
  • माँ – 38.51 कोटी रुपये
  • द डिप्लोमॅट – 40.73 कोटी रुपये
  • सनम तेरी कसम (री-रिलीज) – 35.55 कोटी रुपये
  • इमर्जन्सी – 20.48 कोटी रुपये

अहान पांडे आणि अनित पड्डा या दोघांचा हा पहिला चित्रपट आहे. करिअरमधील पहिल्या चित्रपटात दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात वाणीच्या ब्रेकअपपासून होते. होणारा पती तिला सोडून जातो आणि त्यानंतर तिची भेट क्रिश नावाच्या एका संगीतकाराशी होते. या दोघांच्या वेदना एकसमान असतात आणि त्यातूनच एक प्रेमकथा फुलत जाते. परंतु अचानक वाणीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे आणि आजारपणामुळे त्यात दु:खद वळण येतं. यापुढे त्यांच्या प्रेमकथेचा शेवट कसा होतो, हे चित्रपटात पहायला मिळतं.

दिग्दर्शक मोहित सुरूने कोविडच्या काळात नेटफ्लिक्सवर ‘द रोमँटिक्स’ या नावाची डॉक्युमेंट्री पाहिली आणि तिथूनच त्याला ‘सैय्यारा’ची कथा सुचत गेली. मोहितला तरुण वर्गासाठी एक लव्ह-स्टोरी बनवायची होती. नवीन कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. अखेर ते सत्यात उतरलं असून आगामी काळात हा चित्रपट कमाईचे बरेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याचं दिसतंय.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.