AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैय्यारा’चा या मराठी चित्रपटाला मोठा फटका; संपूर्ण आठवड्यात एकदाही..

'सैय्यारा' या चित्रपटाचा मोठा फटका एका मराठी चित्रपटाला बसला आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. परंतु थिएटर मालकांकडून फक्त 'सैय्यारा'ला प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे मराठी चित्रपटाला स्क्रिन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

'सैय्यारा'चा या मराठी चित्रपटाला मोठा फटका; संपूर्ण आठवड्यात एकदाही..
अहान पांडे, अनित पड्डाImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 25, 2025 | 12:07 PM
Share

अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सैय्यारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने 170 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीमुळेही खूप फायदा होता आहे. तर दुसरीकडे ‘सैय्यारा’मुळे एका मराठी चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. ‘येरे येरे पैसा 3’ या चित्रपटाला संपूर्ण आठवड्यात एकदाही प्राइम टाइम मिळाला नाही. इतकंच नव्हे तर हा चित्रपट आता सर्व थिएटर्समधून उतरवला आहे. थिएटर मालकांचा ‘सैय्यारा’ या हिंदी चित्रपटाला प्राधान्य असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे ‘येरे येरे पैसा 3’ला स्क्रिन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

‘सैय्यारा’ हा चित्रपट 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच दिवशी मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलर आणि गाण्यांमुळे या मराठी चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. परंतु हिंदी चित्रपटामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला स्क्रिन्स मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 5 कोटी रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळाली. सगळ्यांचंच लक्ष त्या पाच कोटी रुपयांवर आहे. मात्र या पाच कोटी रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळतं.

दुसरीकडे मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैय्यारा’ हा चित्रपट सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे. नवोदित कलाकार, त्यातील गाणी आणि चित्रपटाची कथा यांमुळे तरुण वर्ग या चित्रपटाकडे विशेष आकर्षित झाला आहे. परंतु या चित्रपटावरूनही दोन गट निर्माण झाले आहेत. एका गटाला हा चित्रपट खूप आवडतोय आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची आठवण करून देतोय. तर दुसऱ्या गटाला हा चित्रपट अजिबात आवडलेला नाही. या चित्रपटाचा बजेट 45 कोटी रुपयांचा असून कमाईद्वारे त्याची वसुली पहिल्या दोन दिवसांतच झाली होती. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा या दोन नवीन कलाकारांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.