AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara OTT Release : ‘सैय्यारा’च्या ओटीटी रिलीजचा खुलासा; कधी अन् कुठे पाहू शकता अहान पांडेचा चित्रपट?

Saiyaara on OTT : अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सैय्यारा' हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Saiyaara OTT Release : 'सैय्यारा'च्या ओटीटी रिलीजचा खुलासा; कधी अन् कुठे पाहू शकता अहान पांडेचा चित्रपट?
अहान पांडे, अनित पड्डाImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 27, 2025 | 10:10 AM
Share

गेल्या आठवड्यात 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ‘सैय्यारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात दिवस उलटले आहेत, तरीसुद्धा त्याची जबरदस्त कमाई सुरू आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर काही प्रेक्षक त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. परंतु ‘सैय्यारा’च्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. खरंतर एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार ते आठ आठवड्यांनंतर तो ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. परंतु आता निर्माते एक नवीन ट्रेंड फॉलो करू पाहत आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट आता तीन महिन्यांनंतर ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. कारण चित्रपटाच्या माऊथ पब्लिसिटीतून निर्मात्यांना आणखी चांगला नफा कमवायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर ओटीटीवर येऊ शकतो. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 170 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर भारताबाहेरही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. जगभरातील कमाईचा आकडा आता 250 कोटींवर पोहोचला आहे. ‘सैय्यारा’ आता ऑक्टोबर महिन्यातील दिवाळीच्या वीकेंडला ओटीटीवर रिलीज होणार आहे.

‘सैय्यारा’ने पहिल्याच दिवशी 21 कोटी रुपयांची कमाई केली होती. रोमँटिक जॉनरच्या चित्रपटासाठी पहिल्याच दिवशी झालेली ही कमाई सर्वाधिक होती. या चित्रपटातून अभिनेते चंकी पांडे यांचा भाचा आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. तर अभिनेत्री अनित पड्डाचाही मुख्य अभिनेत्री म्हणून हा पहिला चित्रपट आहे. याआधी तिने ‘सलाम वेंकी’मध्ये छोटी भूमिका साकारली होती.

सोशल मीडियावरही सध्या ‘सैय्यारा’चीच चर्चा आहे. या चित्रपटाचे रील्स, व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. एखाद्या गोष्टीची अधिकाधिक चर्चा होऊ लागली की साहजिकच त्याविषयी कुतूहल निर्माण होतं. हेच कुतूहल आणि माऊथ पब्लिसिटी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून घेऊन येत आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.