Salman Khan : सलमान खान लवकरच होणार सासरा… भाईजानची सून करते कॉर्पोरेट जॉब… कोण आहे ती?
Salman Khan : सासर गडगंड श्रीमंत... सलमान खान याची होणारी सून करते कॉर्पोरेट जॉब... भाईजान लवकरच होणार सासरा... कोण आहे खान कुटुंबियांनी होणारी सून? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भाईजानच्या सूनेची चर्चा...

Salman Khan : अभिनेता सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान याने लग्न केलं नाही. पण सलमान खान लवकरच सासरा होणार आहे… खान कुटुंबात लवकरच नव्या व्यक्तीचं आगमन होणार आहे. खान कुटुंबात लवकरच सनई – चौघडे वाजणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खान कुटुंबाची होणारी सून अभिनेत्री किंवा गायक नाही… तर कॉर्पोरेट विश्वातील प्रसिद्ध व्यक्ती आहे.
सलमान खान याच्या होणाऱ्या व्यक्तीचं नाव टीना रिजवानी (Tina Rijhwani) असं आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याचा भाचा अयान अग्निहोत्री (Ayaan Agnihotri) याचं लवकरच लग्न होणार आहे. नुकताच, अयान याने टीनासोबतच्या त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. सध्या सर्वत्र अयान आणि टीना यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
अयान याने केला साखरपुडा
अयान याने 3 जानेवारी 2026 मध्ये इन्स्टाग्राम अकाउंटवर गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केल्याचे काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोमध्ये टीना तिच्या साखरपुड्याचे अंगठी दाखवताना दिसत आहे… फोटो पोस्ट करत अयान कमेंटमध्ये म्हणाला, ‘2025 मध्ये माझ्या गर्लफ्रेंडला मागे सोडून दिलं..’, सध्या अयान याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अयान याच्या पोस्टवर फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंट करत, दोघांना नवीन आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेत्री मलायका अरोरा, शूरा खान, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल यांनी देखील कमेंट करत अयान आणि टीना यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कॉर्पोरेट विश्वातील प्रसिद्ध व्यक्ती आहे खान कुटुंबाची होणारी सून
फोटो व्हायरल होताच, लोक अयान अग्निहोत्रीची होणारी पत्नी कोण आहे हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. जर तुम्हाला वाटत असेल की ती देखील सिनेमा जगतातील आहे, तर ते खरं नाही. ती कॉर्पोरेट जगात स्वतःचं नाव कमवत आहे आणि ब्लू अॅडव्हायझरीशी संबंधित आहेमिळालेल्या माहितीनुसार, टीना कम्युनिकेशंस क्षेत्रात काम करत आहे…
तर अयान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अयान सलमान याची बहीण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा आहे… अयान याला म्यूजिक व्हिडीओमध्ये सलमान खान याने लॉन्च केलं आहे.
