Salman Khan : सलमान खानला भेटण्यासाठी धावला फॅन, बॉडीगार्डचं वागणं पाहून नेटकरी संतापले; Video
Salman Khan Bodyguard : सेलिब्रिटींच्या जवळ त्यांच्या चाहत्यांनी जाणं हे काही नवं नाहीये. पण यावेलेला वेगळंच काही घडलं. मुंबई मध्ये'प्रेम कीटाणु' च्या स्पेशल स्क्रीनिंग दरम्यान एका चाहत्याने सलमानला पाहिलं आणि तो अचानक त्याच्या जवळ गेला.. त्यानंतर जे घडलं...

अभिनेता सलमान खान (Salman Khan) चं फॅन फॉलोईंग किती मोठं आहे, ते सर्वश्रुत आहे. तो जिथे जातो, त्याला पाहून चाहत्यांची गर्दी होतेच. पण मुंबईत नुकतंच असं काही घडलं की त्याच्या व्हिडीओच सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे. खरंतर ‘प्रेम कीटाणु’ च्या स्पेशल स्क्रीनिंगला सलमान खान आला होता, मात्र तेवढ्यात त्याच्या जवळ एक फॅन पोहोचला. त्यानंतर सेक्युरिटी टीमने जे केलं, ते सोशल मीडिया युजर्सना बिलकूल आवडलेलं नाही, अनेकांनी त्यावर नाराजी वर्तवली आहे.
खरंतर , काल म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुंबईमध्ये ‘प्रेम कीटाणु’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अभिनेता सलमान खान तिथे पोहोचला. थिएटरच्या बाहेरच भाईजानची अभिनेता अनुप सोनीशी भेट झाली. त्यांनी एकमेकांसोबत फोटोही काढून घेतला. मात्र याच दरम्यान सुरक्षा कडं भेदून एक चाहता सलमानला भेटण्यासाठी , त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तिथे पोहोचला. मात्र, तेव्हा सलमानच्या बॉडीगार्ड्सनी तातडीने त्या चाहत्याला हातानं पकडलं आणि खेचत सुपरस्टारपासून दूर केलं.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या विविध कमेंट्स
हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर बराच वाद सुरू आहे. सोशल मीडिया युजर्सनी बॉडीगार्ड्सच्या या वागणुकीवर टीका केली आहे. मात्र काही लोकांच्या मते, सेलिब्रिटींची सुरक्षा आणि गर्दीतील व्यवस्था राखण्यासाठी असं करणं आवश्यक असतं.
“सुरक्षा राखली पाहिजे, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याला पकडले, ते योग्य नाही” असं एकाने लिहीलं. तर “ प्रत्येक चाहता हा सन्मानाचा हक्कदार आहे” असं आणखी एकाने कमेंट करत सुनावलं. “भाई, तोसुद्धा एक माणूस आहे.” असं आणखी एकाने ऐकवलं. तर आणखी एकाने कठोर सवाल विचारला. “ ही काय दादागिरी आहे? कोणी अभिनेता असेल तर त्याच्यासोबत असे वागणार का? ” असा थेट प्रश्न त्याने विचारला.
सलमानचे प्रोजेक्ट्स
कामाबद्दल बोलायचं जालं तर, सलमान खानकडे आगामी काळात अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांपैकी एक ‘मातृभूमी’ आहे, ज्यामध्ये तो चित्रांगदा सिंहसोबत दिसणार आहे. ‘मातृभूमि’ या चित्रपटात तो चित्रांगदा सिंहसोबत दिसेल. तर निर्माता दिल राजू यांच्यासोबत त्याचा बहुचर्चित ॲक्शन चित्रपट ‘मॉन्स्टर’ (Monster) देखील पाइपलाइनमध्ये आहे. वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित आणि नयनतारा अभिनित हा पॅन-इंडिया प्रोजेक्ट पुढल्या वर्षी ईडला रिलीज होणार आहे.
