AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानचं मोठं वक्तव्य, ‘प्रत्येक वर्षी होत असतो गणरायाचा अपमान, कारण…’, व्हिडीओ व्हायरल

Salman Khan: 'प्रत्येक वर्षी होत असतो गणरायाचा अपमान...', सलमान खानच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत चाहते म्हणाले, 'हा प्रत्येक वर्षी स्वतःच्या घरात...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा...

सलमान खानचं मोठं वक्तव्य, 'प्रत्येक वर्षी होत असतो गणरायाचा अपमान, कारण...', व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Aug 29, 2024 | 11:53 AM
Share

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान उपस्थित राहिला होता. कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कार्यक्रमात सलमान खान याने गणेशोत्सवाबद्दल अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. ज्यावर नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. सध्य सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच झालेल्या कार्यक्रामात सलमान खान याने सर्वांना इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. भाईजान म्हणाला, ‘किती खराब वाटतं… पीओपी आणि इत्यादी गोष्टींनी घडलेल्या गणपतीची आपण स्थापना करतो. गणरायाचं विसर्जन करतो तेव्हा त्याचे पाय, मान, सोंड, हात सगळीकडे पसरलेले असतात… त्यामुळे सर्वांनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायला हवा…’ असं वक्तव्य सलमान खान याने नुकताच झालेल्या केलं आहे.

सलमान खानच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी म्हणाले, ‘भाईने बोला करने का तो करने का…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सलमान खान माझ्या मनातील गोष्ट बोलला आहे…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हा प्रत्येक वर्षी स्वतःच्या घरी गणपती आणतो. मुस्लीम असून देखील गणेशोत्सव साजरा करतो.’ तर अनेकांनी सलमान खान याला ट्रोल देखील केलं आहे.

सांगायचं झालं तर, सलमान खान दरवर्षी स्वतःच्या घरात गणरायाची स्थापणा करतो. गणपती निमित्त अभिनेत्याच्या घरात अनेक सेलिब्रिटी देखील दर्शनासाठी येत असतात. सलमान खान स्वतः मनोभावे गणरायाची पूजा करतो. भाईजानच्या घरातील गणेशोत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

सलमान खान याचे आगामी सिनेमे…

समलान खान याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो.

आता सलमान खान लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील पुन्हा अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.