AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान याचा चढला पारा, थेट ‘या’ अभिनेत्रीच्या पतीला म्हटले ‘फट्टू’, मोठी पोलखोल

सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच टायगर 3 हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सलमान खान याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

सलमान खान याचा चढला पारा, थेट 'या' अभिनेत्रीच्या पतीला म्हटले 'फट्टू', मोठी पोलखोल
| Updated on: Nov 24, 2023 | 2:08 PM
Share

मुंबई : बिग बॉस सीजन 17 धमाका करताना दिसत आहे. आज बिग बॉस 17 मध्ये विकेंडचा वार पार पडणार आहे. यावेळी सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसणार. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये सलमान खान याच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आणि मुनव्वर फारुकी हे दिसत आहेत. इतकेच नाही तर विकी जैन याला सलमान खान हा थेट म्हणतो की, विकी भाई हा सर्वात जास्त फट्टू गेम खेळत आहे. यावेळी विकी जैन हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, सलमान खान त्याला पुढे काही बोलू देत नाही.

सलमान खान हा विकी जैन याला थेट म्हणतो की, विकी माझे म्हणणे ऐकून घे…सलमान खान याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताना विकी जैन हा दिसतोय. दुसरीकडे मुनव्वर फारुकी याला देखील सलमान खान म्हणतो की, तुला वाटत असेल की तू खूप चांगला गेम खेळत आहेस. मात्र, असे अजिबातच नाहीये तुला यामध्ये काय मजा येत आहे.

मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांनी एक गेम प्लॅन तयार केला असून ते घरातील सदस्यांना त्यांच्या तालावर नाचवत आहेत. हेच नाही तर विकी जैन हा नाॅमिनेशनपासून वाचण्यासाठी हे सर्व करत आहे. विशेष म्हणजे विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांचे एकही नाते घरातील खरे नाहीये. ते फक्त गेमसाठी हे करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

थोडक्यात काय तर सलमान खान याने विकी जैन आणि मुनव्वर फारुकी यांचा खरा चेहरा घरातील सदस्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मुनव्वर फारुकी हा देखील सलमान खान याला समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता हाच प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते यावर प्रतिक्रिया या देताना दिसत आहेत.

नुकताच बिग बॉस सीजन 17 च्या निर्मात्यांनी घरातील सदस्यांना एक राशनचा टास्क दिला. यावेळी घरात मोठा हंगामा होताना दिसला. आता बिग बॉस सीजन 17 मध्ये काही नवीन सदस्य हे दाखल होताना दिसत आहेत. बिग बॉस सीजन 17 ला अजूनही टीआरपीमध्ये म्हणावा तसा काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. यामुळेच निर्मात्यांनी मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत