Salman Khan : बाप गोळ्या घालेल ना? सलमानचा फार्म हाऊस स्वैराचाराचा अड्डा; भाईजान नेमकं काय म्हणाला?
भाईजान सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. कधी त्याच्या सिनेमामुळे, कधी त्याच्या फिटनेसमुळे, कधी त्याच्या केसेसमुळे तर कधी त्याच्या सामाजिक कामामुळे. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या पनवेलमधील फार्म्स हाऊसमुळे. एका यूजर्सने त्याच्या फार्म हाऊसवर कमेंट केली. ही कमेंट सलमानला झोंबली आणि त्याने असं काही उत्तर दिलं की विचारता सोय नाही.

बॉलिवूडचे अनेक अभिनेते त्यांच्या मालमत्तेमुळे नेहमीच चर्चेत असतात. या कलाकारांचे अलिशान बंगले, महागड्या गाड्या आणि राहणीमानावर त्यांच्या फॅन्सचं लक्ष असतं. परंतु, बॉलिवूडमध्ये दबदबा असलेला सलमान खान मात्र अजूनही गॅलक्सी बिल्डिंगच्या एका अपार्टमेंटमध्ये राहतो. सलमान मोठं घर किंवा बंगला खरेदी करू शकत नाही, असं नाही. सलमानचे आईवडील गॅलेक्सीमध्ये राहतात. त्यामुळे सलमानही आईवडिलांसोबतच राहतो. असं असलं तरी सलमानचा पनवेलमधला फार्म हाऊस नेहमीच चर्चेत असतो. त्याने बहिणीच्या नावावरून या फार्म हाऊसला अर्पिता फार्म्स हाऊस असं नाव दिलं आहे.
150 एकरमध्ये हा फार्म हाऊस आहे. बहिणीच्या नावाने बनवलेल्या या फार्म हाऊसबाबत नेहमी लोकांच्या वेगळ्या कमेंट ऐकायला येतात. अरबाज खानने आपल्या पॉडकास्टमध्ये सलमान खानला बोलावलं होतं. पनवेलच्या या फार्म हाऊसबाबत लोक काय काय विचार करतात याबाबत विचारलं होतं. त्यावर सलमानने बिनधास्त उत्तर दिलं होतं. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सलमान आणि अरबाज खान दिसत आहेत.

तो तर अर्पिताचा फार्म हाऊस
तुमचं फार्म हाऊस आहे, असं अरबाज सलमानला म्हणतो. त्यावर सलमान खान हसून म्हणतो, तुझाच फार्म हाऊस आहे. त्यावर अरबाज म्हणतो, एखाद्या गाण्यात आलंय, वा एखाद्या व्हिडिओत आलोय, वा तूच काही तरी दाखवलं आहे. तुझ्या फार्म हाऊसचा नकाशा लोकांकडे आहे. त्यावर सलमान लगेच म्हणतो, एक गोष्ट स्पष्ट सांगतो. तो फार्म हाऊस माझा नाही. तो अर्पिताचा आहे. आणि आपल्या सर्वांचा आहे. त्यावर अरबाज म्हणतो, एका यूजर्सने मजेदार कमेंट केलीय. तो म्हणतो या फार्म हाऊसला जिल्हा घोषित करा.
View this post on Instagram
बाप गोळ्या घालेल ना…
त्यावर, सलमानही तितक्याच दिलखुलासपणे म्हणतो, आमच्या कुटुंबात एवढे लोक आहेत की या फार्म हाऊसला एक जिल्हा घोषित करू शकतो. कारण आपल्या खानदानात जवळपास 250 ते 300 लोक आहेत. मित्र आणि कुटुंबातील लोक. त्यानंतर अरबाज हेल्थ वेल्थ अँड हॅपिनेस नावाच्या एका यूजरची कमेंट वाचून दाखवतो. अरबाज म्हणतो, हा यूजर म्हणतोय की सलमानचा फार्म हाऊस स्वैराचाराचा अड्डा आहे. त्यावर सलमान उत्तर देताना सांगतो की, माझ्या फार्म हाऊसला स्वैराचाराचा अड्डा म्हणायला या लोकांनी फार्म हाऊसमध्ये असं काय पाहिलंय? लॉकडाऊनमध्ये माझ्या ज्या काही पोस्ट आल्या त्या एक तर वर्कआऊट करतानाच्या होत्या किंवा शेती करतानाच्या होत्या. त्यामुळे तुम्ही त्याला स्वैराचाराचा अड्डा कसं म्हणता? माझा फार्म हाऊस स्वैराचाराचा अड्डा असण्याची शक्यताच नाही. तसं झालं तर आपला बाप आपल्या दोघांना गोळ्या घालेल ना?, असं सलमान म्हणाला.
