Vivek Oberoi | फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विवेक ओबेरॉयच्या घरावर क्राईम ब्रँचचा छापा!

फरार आरोपी आदित्य अल्वा विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला अर्थात सीसीबीला मिळाली आहे.

Vivek Oberoi | फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विवेक ओबेरॉयच्या घरावर क्राईम ब्रँचचा छापा!

मुंबई : ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. या प्रकरणातील आरोपी आदित्य अल्वा (Aditya Alwa) सध्या फरार आहे. आदित्य अल्वा हा विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे. त्यामुळे आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला अर्थात सीसीबीला मिळाली आहे. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉय याच्या घरी धाड टाकली आहे. (Sandalwood drug case ccb raids vivek oberoi house for searching Aditya alwa)

बंगळुरूचे पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले की, ‘आदित्य अल्वा फरार असून, पोलीस कसोशीने त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. विवेक ओबेरॉय त्याचा नातेवाईक असल्याने तो सध्या विवेकच्या घरी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे कोर्टाकडून वॉरंट घेऊन, मुंबईची सीसीबी टीम विवेकच्या घरी पोहोचली आहे’.

कन्नड चित्रपटसृष्टीतील ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरण

सध्या बॉलिवूड ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. ड्रग्जच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत बऱ्याच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात सीसीबीने मागील महिन्यात विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा याच्या घराची तपासणी करण्यासाठी सर्च वॉरंट जारी केले होते. त्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या घराचीही झडती घेण्यात आली होती. (Sandalwood drug case ccb raids vivek oberoi house for searching Aditya alwa)

सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य अल्वा याचा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीशी जवळचा परिचय आहे. कोट्टनपेट पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात आदित्य अल्वा यांचे नावही समोर आले आहे. तसेच आदित्य हा आणखी बऱ्याच पार्ट्यांमध्ये सहभागी झाला होता. या माहितीमुळे पोलिस आदित्यपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आदित्य पोलिसांच्या तावडीपासून दूर पळत असून, अद्याप त्याला पकडण्यात यश आलेले नाही.

आदित्य अल्वा फरार घोषित

प्राप्त माहितीनुसार, या ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आदित्य (Aditya Alwa) सतत लपण्याची जागा बदलत आहे. तसेच, त्याने आपला फोनदेखील बंद केला आहे. ‘सँडल वुड ड्रग्ज’ घोटाळ्याची माहिती निर्माता-दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांनी सीसीबीला दिली होती. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्येही ड्रग्सचे व्यवहार सुरू असल्याचे त्याने सीसीबीला सांगितले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान इंद्रजित लंकेश यांनी 15 जणांची नावे घेतली होती. त्यापैकी अभिनेत्री रागिनी द्विवेदीला ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय कन्नड अभिनेत्री संजना गलराणीलाही पोलिसांनी अटक केली होती.

(Sandalwood drug case ccb raids vivek oberoi house for searching Aditya alwa)

Published On - 2:42 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI