सानिया मिर्झाने सोशल मीडियावर उचललं हे पाऊल; शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या वैवाहिक आयुष्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. सानियाने सोशल मीडियावरील शोएबचे सर्व फोटो डिलिट केले आहेत. यामुळे या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

सानिया मिर्झाने सोशल मीडियावर उचललं हे पाऊल; शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
Sania Mirza and Shoaib MalikImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 3:26 PM

मुंबई : 15 जानेवारी 2024 | गेल्या काही महिन्यांपासून टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान आता सानियाने असं पाऊल उचललंय, ज्यामुळे पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सानिया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊटंवरून पती शोएब मलिकचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे शोएब मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमधून सानिया मिर्झाशी विवाहित असल्याची माहिती काढून टाकली आहे. याआधी त्याच्या बायोमध्ये ‘सुपरवुमनचा पती’ असा उल्लेख होता.

शोएब आणि सानियाने 2010 मध्ये लग्न केलं होतं आणि तेव्हापासून ते दुबईमध्ये राहत आहेत. सानियाने 2018 मध्ये मुलगा इझानला जन्म दिला. शोएब आणि सानिया हे कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेण्याच्या विचारात असल्याचंही म्हटलं जातं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं वेगवेगळे राहत असल्याचीही चर्चा होती. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरचं शोएबशी नाव जोडलं गेलं होतं. त्यावर आयेशानेही प्रतिक्रिया दिली होती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

आयेशाने शोएब मलिकच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शोएबसोबतच्या तिच्या कथित अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही. प्रत्येकजण मला ओळखतो आणि हे मी न सांगता सर्वांना माहीत आहे.” आयेशा आणि शोएबने एक फोटोशूट केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आयेशाने सांगितलं होतं की शोएबसोबत तिने एक वर्षापूर्वी ते फोटोशूट केलं होतं. मात्र कॉन्ट्रोव्हर्सी पाहून माध्यमांनी त्या फोटोंचा वापर चुकीच्या पद्धतीने केला.

“शोएबसोबत मी एक प्रोफेशनल फोटोशूट केलं होतं. जर एखाद्याचं अफेअर असेल तर तो अशा पद्धतीचं फोटोशूट करून त्याला सोशल मीडियावर का पोस्ट करेल? मी कधीही कोणत्याही विवाहित पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही”, असं तिने स्पष्ट केलं होतं.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.