308 हून अधिक मुलींशी अफेअर, 3 लग्न करणाऱ्या संजय दत्तला नक्की किती मुले? मोठी मुलगी तर चक्क 37 वर्षांची
संजय दत्त हे नाव आजही बॉलिवूडमध्ये तेवढंच प्रसिद्ध आहे. संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य हे कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाहीये. त्याचे अफेअर्स आणि लग्न याची चर्चा आजही पाहायला मिळते. चला जाणून घेऊयात या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची जास्त चर्चा झालेली पाहायला मिळते. असाच एक अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटांची तर चर्चा झालीच पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा नेहमीच झाली आणि आजही होते. हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा बाबा म्हणजेच संजय दत्त.
संजय दत्तने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली
संजय दत्त हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक चढ-उतारांना तोंड देऊनही, संजय दत्तने भारतीय चित्रपटसृष्टीतील स्वतःची वेगळी आणि खास अशी ओळख निर्माण केली आहे. संजय दत्तने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असली तरी, तो अनेक वादांमध्येही अडकला आहे.
संजय दत्तचे तब्बल 308 हून अधिक अफेअर्स
पण त्याहीपेक्षा तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा कायम रंगलेल्या दिसल्या. असं म्हटलं जातं की संजय दत्तचे तब्बल 308 हून अधिक अफेअर्स होते. त्याचे नाव टीना मुनीम, माधुरी दीक्षित आणि रेखा सारख्या अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. तसेच संजय दत्तचे तीन लग्न झाले होते. त्यामुळे त्याचे वैयक्तिक आयुष्य हे चित्रपटासारखंच रंजक राहिलं आहे. संजय दत्तच्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल जाणून घेऊया.
ही अभिनेत्री संजय दत्तची पहिली पत्नी होती
संजय दत्तने 1987 मध्ये रिचा शर्माशी लग्न केले. रिचा आणि संजय दत्त यांना एक मुलगी त्रिशला दत्त आहे जी न्यू यॉर्कमध्ये राहते. लग्नानंतर रिचाला कर्करोगाचे निदान झाले. तिने अमेरिकेत या आजारावर उपचार घेतले. तिची प्रकृती आता सुधारली होती. मात्र नंतर तिची प्रकृती पुन्हा बिघडू लागली आणि 10 डिसेंबर 1996 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी तिचे निधन झाले. रिचा शर्माने देव आनंदच्या ‘हम नौजवान’, ‘अनुभव’, ‘इन्साफ की आवाज’, ‘सडक छप’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
10 वर्षांनी दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट
रिचा शर्माच्या मृत्यूनंतर, मॉडेल रिया पिल्लई संजयच्या आयुष्यात आली. ते एकमेकांना आधीपासून ओळखत होते. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात जेव्हा संजयला तुरुंगात जावे लागले तेव्हा त्यांची जवळीक वाढली. त्या काळात रियाने संजयची साथ सोडली नाही. कठीण काळात संजयने रिया पिल्लईला त्याच्यासोबत उभी असल्याचे पाहिले आणि तिच्या स्वभावाने त्याचे मन जिंकले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, संजयने व्हॅलेंटाईन डेला रियाला प्रपोज केले आणि त्यांनी 14 फेब्रुवारी 1998 रोजी लग्न केले.
View this post on Instagram
संजयने रियाशी घटस्फोट का घेतला?
लग्नानंतर संजय दत्तने एकाच वेळी अनेक चित्रपट साइन केले आणि शूटिंगमध्ये व्यस्त झाला. यामुळे तो रियाला वेळ देऊ शकत नव्हता. यामुळे त्यांच्यातील अंतर वाढले आणि दहा वर्षांच्या लग्नानंतर 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचे हे नाते तुटण्यासाठी संजयला जबाबदार धरण्यात आले, ज्यामुळे तो लोकांच्या नजरेत खलनायक बनला. तथापि, काही आतल्या लोकांचा असा विश्वास आहे की संजय दत्त मान्यताशी जवळीक साधत असताना, रिया टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करत होती. याचं कारणाने दोघेही वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
संजय दत्तने घटस्फोटाच्या बदल्यात वांद्रे येथील दोन फ्लॅट रिया पिल्लईला दिल्याचे म्हटले जाते. तसेच, त्यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे शेअर्स देजा वू एंटरटेनमेंट आणि ग्लोबल एंटरटेनमेंट रियाच्या नावावर केल्याचं देखील म्हटलं जातं.
मान्यतासोबत तिसरे लग्न
त्याची दुसरी पत्नी रिया पिल्लईपासून घटस्फोट घेतल्यानंतर, संजय दत्तने मान्यताशी 7 फेब्रुवारी 2008 रोजी गोव्यातील ताज एक्झोटिका येथे लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी, 21 ऑक्टोबर 2010 रोजी, या जोडप्याने त्यांच्या 2 जुळ्या मुलांचे स्वागत केले.
View this post on Instagram
संजय दत्तला त्याच्या तीन लग्नांपासून किती मुले आहेत?
संजय दत्तला त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्यापासून एक मुलगी त्रिशला दत्त आहे, जी आता 37 वर्षांची आहे. त्याला रिया पिल्लईपासून कोणतेही मूल झाले नाही. तर मान्यता दत्त हिच्यापासून त्याला दोन जुळी मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.
पण अजूनही संजय दत्तची फॅनफॉलोईंग किंवा त्याच्याबद्दलचं चाहत्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. आजही त्याची स्टाईल आणि चित्रपट पाहायला चाहते आतुर असतात.
