डाकू रूपाने केले होते संजय दत्तचे अपहरण? सुनील दत्त यांनी तेव्हा घेतला मोठा निर्णय
या अभिनेत्याला त्याच्या डाकूच्या भूमिकांसाठी ओळखलं जातं. एकदा तो चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर असताना खरा डाकू रूपा तिथे आला आणि त्याने काहीसं त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी अतिशय हुशारीने आपल्या मुलाला सुरक्षित बाहेर काढलं.

बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनेकदा कपिल शर्माच्या शोमध्ये जातात. या शोमध्ये कपिल शर्मा सेलिब्रिटींसोबत मजा-मस्ती तर करतोच, शिवाय अनेक असे गुपितंही समोर येतात ज्याबद्दल चाहते अनभिज्ञ असतात. संजय दत्त एकदा त्याच्या ‘प्रस्थानम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत कपिलने खूप मजा केली. दरम्यान, संजय दत्त यांनी असा एक किस्सा सांगितला, जो ऐकून सर्वजण थक्क झाले. संजय दत्तने सांगितलं की, लहानपणी एकदा डाकूने त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता.
कोणी केलं संजय दत्तचं अपहरण?
कपिल शर्माने संजय दत्तला विचारलं की, एक अफवा आहे की तुमचे वडील सुनील दत्त यांच्या ‘मुझे जीने दो’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुंडांनी तुमचं अपहरण केलं होतं. यावर संजय दत्त म्हणाला की, डाकूंनी माझं अपहरण करण्याचा प्लॅन केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. संजय दत्त म्हणाले, “त्यांनी प्रयत्न केला होता. त्या काळात रूपा डाकू सक्रिय होता. तो माझ्या वडिलांना, म्हणजेच दत्त साहेबांना भेटला होता, तेव्हा मी खूप लहान होतो.”
वाचा: मुलापासून मुलगी बनलेल्या अनया बांगरचा जलवा, हे फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल
वडिलांची कशी होती प्रतिक्रिया?
संजय दत्त पुढे म्हणाला, “त्याने मला आपल्या मांडीवर घेतलं आणि दत्त साहेबांना विचारलं, ‘तुम्ही चित्रपट बनवण्यासाठी किती पैसे खर्च करता?’ त्यांनी उत्तर दिलं, ‘१५ लाख.’ त्यानंतर त्याने माझ्या वडिलांना विचारलं, ‘जर आम्ही या मुलाला पळवलं तर तुम्ही आम्हाला किती पैसे द्याल?’ माझे वडील तेव्हा हुशारीने हसले आणि मला त्याच्या मांडीवरून परत घेतलं. त्या दिवशी शूटिंग रद्द झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला, माझ्या आईला मुंबईला परत पाठवलं. म्हणून ती अफवा अर्धवट खरी आहे. माझं अपहरण झालं नव्हतं, पण त्यांनी तसा प्लॅन केला होता.”
संजय दत्तच्या सिनेमाविषयी
संजय दत्तने आतापर्यंत जवळपास 160 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने हिंदीसह तेलुगू, कन्नड, तमिळ आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलंय. संजयने चौकटीबाहेरच्या भूमिका स्वीकारल्या असून नायक आणि खलनायक अशा त्याच्या दोन्ही भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालंय.
