AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trouble | संजय लीला भन्साळीचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, शूटिंग थांबण्याची शक्यता!

संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट आणि वाद हे समीकरण नवे नाही. त्यांचा कुठल्याही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होतोच.

Trouble | संजय लीला भन्साळीचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, शूटिंग थांबण्याची शक्यता!
| Updated on: Dec 23, 2020 | 10:58 AM
Share

मुंबई : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचे चित्रपट आणि वाद हे समीकरण नवे नाही. त्यांचा कुठल्याही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वाद होतोच. आता यावेळी शूटिंगदरम्यान गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाच्या अडचणी वाढल्या आहेत. हा चित्रपट हुसेन जैदी (Hussain Zaidi) यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. आता गंगूबाईच्या कुटुंबियांनी 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांना चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत. (Sanjay Leela Bhansali’s film ‘Gangubai Kathiawadi’ in trouble)

संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन जैदी यांना त्यांचे मत मांडण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आलिया सध्या या चित्रपटाचे मुंबईत शूटींग करत आहे. या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी बरीच कामे केली आहेत. अनेक आर्किटेक्ट बोलल्यानंतर सेटला अंतिम रूप देण्यात आले आहे. ते तयार करण्यासाठी सुमारे साडेसहा कोटी रुपये लागले आहेत.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे.

हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गांगुबाई ह्या तिच्या पतीकडून केवळ 500 रुपयांत विकली होती. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात गुंतली. यावेळी तिने अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

संबंधित बातम्या : 

Alia Bhatt | रणबीरबरोबर लग्न कधी करणार? वाचा आलिया भट्टचं उत्तर!

मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

New Song | रिचा चड्ढाच्या ‘बेली डांन्सचा’ सोशल मिडियावर धुमाकूळ!

(Sanjay Leela Bhansali’s film ‘Gangubai Kathiawadi’ in trouble)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.