एवढा भयानक पुरुषच भेटला…, रूपल त्यागीने गुपचूप उरकला साखपुडा, दोघांचे फोटो पाहून चाहते थक्क
Sapne Suhane Ladakpan Ke fame Roopal Tyagi : ‘सपने सुहाने लडकपन के’ फेम अभिनेत्री रुपल त्यागी सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड नोमिश भारव्दाज याच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.

Sapne Suhane Ladakpan Ke fame Roopal Tyagi : ‘सपने सुहाने लडकपन के’ मालिका 90 च्या दशकातील मुलांना आठवतच असेल. मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मालिका दोन मुलांच्या आयुष्याभोवती फिरताना दिसली. मालिकेतील गुंजन ही भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे आणि ती म्हणजे गुंजन… अभिनेत्री रुपल त्यागी हिने मालिकेत गुंजन नावाच्या भूमिका साकारली होती. गेल्य अनेक दिवसांपासून लाईमलाईटमध्ये नसलेली रुपल आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
रुपल त्यागी लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. रुपल त्यागी हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये रुपल हिने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचं चित्र दिसत आहे. रुपल हिने नोमिश भारव्दाज नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे… सध्या रुपल हिचे होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो व्हायरल होत आहेत.
फोटो पोस्ट करत रुपल हिने YES… म्हणत नोमिश याला लग्नासाठी होकार दिला आहे. रुपल आणि नोमिश 5 डिसेंबर 2025 मध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. रुपल हिच्या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
पण अनेकांना रुपल हिला ट्रोल देखील केलं आहे. एक नेटकरी रुपल हिच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘आजच्या मुलींना म्हातारेच का आवडतात…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘एवढा भयानक पुरुषच भेटला होता का? दुसरा कोणी भेटला नाही का. त्याला बघूनच भीती वाटते…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणता नाईलाज होता…’
रुपल त्यागी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘हमारी बेटियों का विवाह’ मालिकेत अभिनेत्रीने तिने मनशा कोहलीची भूमिका साकारली होती. याशिवाय रूपलने ‘कसम से’, ‘एक नई छोटी सी जिंदगी’ आणि ‘सपने सुहाने लडकपन के’ या टीव्ही मालिकांमध्ये काम करत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
रुपल त्यागी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे. ‘झलक दिखला जा’ या रिॲलिटी टेलिव्हिजन शोच्या आठव्या सीझनमध्ये अभिनेत्री दिसली होती. याशिवाय रुपल बॉस सीझन 9 मध्ये देखील स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आली. आता रुपल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
