Sushant Singh Rajput | सारा अली खानने ‘या’ खास पद्धतीने साजरा केला सुशांतचा वाढदिवस; फोटो पाहून चाहते भावूक

अभिनेत्री सारा अली खानने सुशांतच्या या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याचेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सुशांतचे चाहते भावूक झाले आहेत.

Sushant Singh Rajput | सारा अली खानने 'या' खास पद्धतीने साजरा केला सुशांतचा वाढदिवस; फोटो पाहून चाहते भावूक
Sara Ali Khan and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 8:14 AM

मुंबई: 21 जानेवारी रोजी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिवस असतो. सुशांतच्या कुटुंबीयांसोबतच त्याच्या असंख्य चाहत्यांनी यादिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री सारा अली खानने सुशांतच्या या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन केलं. त्याचेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सुशांतचे चाहते भावूक झाले आहेत. साराने सुशांतसोबतच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली होती.

शनिवारी साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती लहान मुलांसोबत केक कापताना दिसतेय. एका स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत तिने सुशांतचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनसाठी एनजीओमध्ये सजावटसुद्धा करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ पोस्ट करत साराने लिहिलं, ‘जन्मदिनाच्या शुभेच्छा सुशांत. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं महत्त्व तुझ्यासाठी काय होतं, हे मला माहीत आहे.’

‘उगवणाऱ्या चंद्राच्या बाजूला उभा राहून तू वरून आम्हाला पाहत असतानाच, आम्ही आज तुझ्या चेहऱ्यावर हास्य आणलं असावं अशी आशा आहे. असाच चमकत राहा, जय भोलेनाथ’, असं तिने पुढे लिहिलं.

स्वयंसेवी संस्थेतील लहान मुलांसोबत सुशांतचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल चाहते भावूक झाले. ‘तुझ्यासारख्या लोकांमुळे आमचा माणुसकीवरील विश्वास आणखी वाढतो’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘हे पाहून डोळ्यात पाणी आलं, तू खूप छान काम केलंस’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.

2018 मध्ये सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटात तिने सुशांतसोबत काम केलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीनेही सुशांतचे काही फोटो पोस्ट करत वाढदिवशी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

‘काय पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांना प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र सुशांतच्या मृत्यूची घटना आजही अनेकांच्या मनाला चटका लावून जाते. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.