‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेला खुशबू तावडेचा रामराम; ‘ही’ अभिनेत्री घेणार उमाची जागा

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत उमाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडेच्या जागी आता नव्या अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे. खुशबूने गरोदरपणामुळे या मालिकेला रामराम केला आहे.

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेला खुशबू तावडेचा रामराम; 'ही' अभिनेत्री घेणार उमाची जागा
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेला खुशबू तावडेचा रामरामImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 4:16 PM

झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडणार आहे. कारण मालिकेत उमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडे म्हणजेच उमाई मालिकेचा निरोप घेत आहे. याला कारण ठरलंय खुशबूकडे असलेली एक गुड न्यूज. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. खुशबूने गरोदरपणातील सात महिन्याचा प्रवास काम करत पूर्ण केला. नुकताच सेटवर तिचा मालिकेतील शेवटचा दिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी तिने बऱ्याच आठवणी सांगितल्या. खुशबूच्या जागी आता मालिकेत नवीन अभिनेत्री दिसणार आहे.

खुशबू तावडेकडून भावना व्यक्त

मालिका सोडताना खुशबू म्हणाली, “उमा माझ्या हृदयाच्या खूप जवळची भूमिका आहे. जुलै 2023 मध्ये या मालिकेचं चित्रीकरण सुरु केलं होतं आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. मालिकेतली खास आठवण सांगायची झाली तर ते म्हणजे आपले सण. जितके सण आहेत तितके या मालिकेत आणि सेटवर आम्ही साजरे केले. गंमत अशी की काही मालिका कधी- कधी आधी शूट करतात. पण आमचं नेमकं ज्यादिवशी जो सण आहे त्या सणाच्या दिवशीच आम्ही शूट करायचो. सेटवर वेगळीच ऊर्जा असायची. मालिकेमुळे मला उमाई म्हणून ओळख मिळाली आणि आता या उमाईची खऱ्या आयुष्यात आईची भूमिका आणि कर्तव्य सांभाळायची वेळ आली आहे.”

हे सुद्धा वाचा

मालिकेतील उमाची भूमिका यापुढे अभिनेत्री पल्लवी वैद्य साकारणार आहे. “मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवीसारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे. कारण मला ‘सारं काही तिच्यासाठी’ने भरभरून दिलं आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे. मला पल्लवीचे मनापासून आभार मानायचे आहेत,” असं खुशबू पुढे म्हणाली. ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका दररोज संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.