AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 27 व्या वर्षी सारा तेंडुलकरने बनवली इतक्या कोटींची संपत्ती

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर जरी सचिन तेंडुलकरची मुलगी असली तरी तिने आपली स्वतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सारा तेंडुलकरने शिक्षण घेता घेता मॉडलिंग देखील सुरु केली. आज तिने जाहिराती आणि इतर व्यवसायाच्या माध्यमातून बरीच संपत्ती कमवली आहे.

वयाच्या 27 व्या वर्षी सारा तेंडुलकरने बनवली इतक्या कोटींची संपत्ती
| Updated on: Oct 15, 2024 | 8:30 PM
Share

लोकप्रिय स्टार किड्सच्या यादीत सारा तेंडुलकरचे नाव देखील सर्वात वर आहे. कारण फॅशन इव्हेंट असो किंवा फ्रेंड्स पार्टी, क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. आईप्रमाणे सारा देखील आरोग्य क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत आहे. परंतु ती ग्लॅमरच्या दुनियेचा देखील एक भाग आहे. तिने एकटीने करोडो रुपये कमवले आहेत.

12 ऑक्टोबर 1997 रोजी साराचा जन्म सचिन तेंडुलकर आणि डॉ. अंजली तेंडुलकर यांच्या घरी झाला. तिला एक भाऊ देखील आहे. अर्जुन तेंडुलकरन वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटमध्ये करिअर करत आहे. दुसरीकडे, साराने तिच्या आईप्रमाणे मेडिकल लाइनचे शिक्षण घेतले आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, साराने बायोमेडिकल सायन्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये तिने मास्टर्स केले आहे. ती AfN-नोंदणीकृत असोसिएट न्यूट्रिशनिस्ट (ANutr) आहे आणि आरोग्य यावर लक्ष केंद्रित करून कार्यात्मक पोषण प्रशिक्षक बनून तिची कौशल्ये आणखी विकसित करण्याच्या मार्गावर आहे. मात्र, आज ती केवळ न्यूट्रिशन नाही तर मॉडेलही आहे.

सारा तेंडुलकरने २०२१ मध्ये मॉडेलिंगची सुरुवात केली होती. Ajio Lux मधून तिने मॉडलिंगला सुरुवात केली. तेव्हापासून ती मॉडेलिंगच्या जगात प्रसिद्ध चेहरा बनली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फॅशन शोच्या मंचावर आपल्या सौंदर्याची जादू पसरवली आहे. इतकंच नाही तर तिने मॉडेल सोबत बिझनेसवुमन देखील आहे. तिने सारा प्लॅनर्स नावाने एक ऑनलाइन व्यवसाय सुरू केला, ज्यामध्ये ती डायरी विकते.

सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती

एका श्रीमंत क्रिकेटरची मुलगी असली तरी देखील साराने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने स्वत:च्या बळावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. रिपोर्ट्सनुसार, सारा जवळपास एक कोटीची मालक आहे. ती मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट, तिचा व्यवसाय आणि इंस्टाग्राम प्रमोशनद्वारे पैसे कमवते. इंस्टाग्रामवर तिचे ७.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.