Shubman Gill नाही, ‘या’ व्यक्तीला डेट करतेय सारा तेंडुलकर? कॉफी डेटपासून स्टेडियमपर्यंत फक्त तोच!
Shubman Gill - Sara Tendulkar | सारा तेंडुलकर हिच्या आयुष्यात शुबमन गिल याच्यासाठी नाही तर, 'या' व्यक्तीसाठी खास स्थान, कोणाला करतेय सारा डेट? कॉफी डेटपासून ते स्टेडियमपर्यंत तो कायम असतो सारासोबत, नक्की कोणाला डेट करतेय सारा तेंडुलकर?

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा दमदार खेळाडू शुबमन गिल कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. शुबमन फक्त त्याच्या उत्तम कामगिरीमुळे नाही तर, सारा तेंडुलकर हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कामय चर्चेत असतो. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त शुबमन आणि सारा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. सारा आणि शुबमन एकमेकांना डेट करत असल्याची माहिती अनेकदा समोर आली. पण आता एक नवीन गोष्ट समोर येत आहे. सारा तेंडुलकर हिच्या आयुष्यात शुबमन गिल याच्यासाठी नाही तर, अन्य एका व्यक्तीसाठी खास जागा आहे, अशी माहिती समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा आणि ती ज्या व्यक्तीला डेट करत आहे, त्याची चर्चा रंगलेली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शुबमन गिल याच्या फॅनपेजवरून व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये शुबमन गिल, सारा तेंडुलकर यांच्यासोब खुशप्रीत सिंग देखील दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सारा, खुशप्रीत याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.




व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त सारा आणि खुशप्रीत यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. शुबमन गिल फॅन पेजवरुन व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आणखी कोणाला वाटलं सारा आणि खुशप्रीत एकमेकांना डेट करत आहेत..’ सध्या ही सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. पण यावर सारा, शुबमन आणि खुशप्रीत यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सांगायचं झालं तर, सारा, शुबमन आणि खुशप्रीत यांच्यात चांगली मैत्री आहे… असं देखील अनेकदा समोर आलं. शुबमन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खुशप्रीत याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती, तेव्हा पोस्टमध्ये सारा हिच्या नावाचा देखील उल्ले करण्यात आला होता. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आला होता.
शुबमन गिल – सारा अली खान
शुबमन गिल आणि सारा अली खान यांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली. शिवाय आवडती अभिनेत्री म्हणून शुबमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं होतं. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं होतं. पण सारा हिने विनोदवीर ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये रंगणाऱ्या सर्वत्र चर्चांना पूर्णविराम दिला. सध्या सर्वत्र सारा अली खान, सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.