अभिनेत्याच्या निधनानंतर पहिल्या बायकोचा धक्कादायक खुलासा, मोलकरणीसोबत प्रेमसंबंध आणि…
अभिनेत्याचे मोलकरणीसोबत प्रेमसंबंध, कुटुंबियांकडून लग्नासाठी दबाव आणि बरंच काही... अभिनेत्याच्या निधनानंतर पहिल्या बायकोता धक्कादायक खुलासा, सध्या सर्वत्र दिवंगत अभिनेत्याच्या पहिल्या बायकोच्या वक्तव्याची चर्चा...

झगमगत्या विश्वातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार लवकर समोर येत नाहीत. दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पहिल्या बायकोने धक्कादायक खुलासे केले आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचे अनेक रहस्य समोर आले आहेत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, दिवंगत अभिनेते ओम पुरी आहेत. ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी सीमा कपूर यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. एका हॉलिवूड सिनेमात काम करत असताना ओम यांचं नंदिता नावाच्या एका पत्रकार महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. एवढंच नाही तर, ओम पुरी यांचे मोलकरणीसोबत देखील प्रेमसंबंध होते.
सीमा कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या एक दिवस आधी ओम पुरी यांनी बायको त्यांच्या सर्व अफेअरबद्दल सांगितलं होतं. मुलाखतीत सीमा म्हणाल्या, ‘आमचा साखरपुडा 1989 मध्ये झाला. दोन्ही कुटुंबियांकडून लवकरात लवकर लग्न करण्याचा दबाव होता.’
‘अन्न भैय्या (अन्नू कपूर) शुटिंगसाठी बाहेर होते. साखरपुड्याबाबत त्यांना दुसरीकडून कळलं. लग्नाच्या बरोबर एक दिवस आधी ओम यांनी मला मोलकरणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं होतं. लग्नाच्या एक दिवस आधी नवऱ्याच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर मला देखील आश्चर्याचा धक्का बसला होता.’
‘लग्न मोडू शकत नव्हते कायम पत्रिका वाटून झाल्या होत्या. रिसेप्शनसाठी देखील खास तयारी करण्यात आली होती. आम्ही झालावाड या छोट्या गावात होतो, जिथे माझे आईवडील खूप आदरणीय होते. ओम मला नदी किनारी घेवून गेले आणि मला म्हणाले की काहीतरी सांगायचं आहे…’

‘मला त्यांनी मोलकरणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल सांगितलं. लग्नाच्या एक दिवस आधी लग्नाला नाही म्हणण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आताच्या महिला प्रचंड धाडसी आहेत, काही महिला तर विधी दरम्यान मागे हटतात.’ ओम पुरी यांच्या विवाहबाह्य संबंधांना कटाळून सीमा कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
ओम पुरी यांच्या बॉलिवूडमधील करीयरबाबत सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘चायना गेट’, ‘डर्टी पॉलिटीक्स’, ‘सीटी ऑफ जॉय’, ‘आर्ध सत्य’, ‘चुपके चुपके’ यांसारख्या अनेक सिनेमात ओम पुरी यांनी दमदार भूमिका साकारत ओम पुरी यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.
