AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरोईनच्या मूडचा काही भरोसा…, गोविंदा – करिश्मा कपूर यांच्या अफेअरचं मोठं रहस्य अखेर समोर

अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या नात्याचं देखील मोठं रहस्य समोर आलं आहे. नुकतात झालेल्या एका मुलाखतीत एका अभिनेत्रीने गोविंदा - करिष्मा यांच्या नात्याचं सत्या सांगितलं आहे.

हिरोईनच्या मूडचा काही भरोसा..., गोविंदा - करिश्मा कपूर यांच्या अफेअरचं मोठं रहस्य अखेर समोर
गोविंदा - करिश्मा कपूर
| Updated on: Jul 26, 2026 | 12:55 PM
Share

अभिनेता गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर आहे… असा खुलासा अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा हिने अनेकदा केला आहे. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री शगुफ्ता आली यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही, करिश्मा हिच्यासोबत काम करताना आलेला अनुभव देखील शगुफ्ता यांनी शेअर केला आहे. शगुफ्ता यांनी ‘हिरो नंबर 1’ सिनेमात करिश्मा आणि गोविंदा यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली, यावर शगुफ्ता म्हणाल्या, ‘करिश्मा प्रचंड मेहनती आहे. पण तिच्यामध्ये खूप घमंड आहे…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शगुफ्ता यांनी सांगितलेले गुपित चर्चेत आहेत.

शगुफ्ता यांना मुलाखतीत असं विचारण्यात आलं की, गोविंदा आणि करिश्मा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं, त्यानंतर कधीच एकत्र दिसले नाहीत? यावर शगुफ्ता म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या आपल्या वेगळ्या प्रायोरिटीज असतात. इंट्रेस्ट कमी झाला असेल… प्रेम, आवड संपून गेली असेल… हिरोईनच्या मूडबद्दल काहीच सांगू शकत नाही. म्हणून प्रचंड महत्त्वाकांक्षी असणं देखील चांगलं नाही. करिश्मा मर्यादेपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी आहे. ती प्रचंड मेहनती आहे. पण तिच्यामध्ये घमंड खूप आहे…’

शगुफ्ता पुढे म्हणाल्या, ‘सेटवर सर्वांसोबत तुमची वागणूक कशी असली पाहिजे… हे देखील फार महत्त्वाचं आहे… जर कोणता सह – कलाकार तुमच्यासोबत काम करत आहे, तर जुळवून घेणं फार महत्त्वाचं असतं… मग त्या कलाकारसोबत तुमचे कोणते सीन नसले तरी काहीही हरकत नाही… मुलाखतीत देखील प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे… याचा आपल्या परफॉर्मेंस मोठी परिणाम दिसून येतो.’

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचं अफेअर…

शगुफ्ता यांना विचारण्यात आलं की, गोविंदा आणि करिश्मा यांच्यात प्रचंड प्रेम होतं? यावर शगुफ्ता म्हणाल्या, ‘दोघांमध्ये प्रेम दिसायचे… दोघे ते स्वतः पुढे येऊन सांगायचे नाहीत, पण त्यांच्यामध्ये प्रेम होतं, ते दिसायचं…’, त्यानंतर अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, ‘दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही?’ यावर शगुफ्ता म्हणाल्या, ‘दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसली तोपर्यंत दिसली… प्रेक्षकांना दिसलं तोपर्यंत पाहिलं… त्यानंतर दोघे बोर झाले असतील… पत्नी सुनीता अहूजा यांना देखील गोविंदा आणि करिश्मा यांच्या नात्याबद्दल माहिती होतं… पण त्यांनी कधीच समोर येऊ दिलं नाही… त्यांनी गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळल्या…’, असं देखील शगुफ्ता म्हणाल्या…

Follow Us
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील Video...
एकच जल्लोष! मनसेतील बड्या नेत्यांचा लोकलने प्रवास, ट्रेनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
Mumbai | मुंबईत मोठ्या घडामोडी! ठाकरे बंधूंच्या विजय सभेपूर्वीच...
प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग,पहा
Thackeray Brothers Sabha | प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा; सगळीकडे लगबग, पहा व्हिडीओ
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय