AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुखने मदतीचं वचन दिलं अन् आता फोनच बंद..; अभिनेत्रीकडून खुलासा

केवळ शाहरुखच नाही तर अमिताभ बच्चन आणि आदेश श्रीवास्तव यांच्यातील नात्याविषयीही विजयता व्यक्त झाली. "अवितेशचा कोणताही कार्यक्रम असला की बिग बी घरी यायचे. पण आता त्यांनी आमच्या स्टुडिओमध्ये येणं बंद केलंय. त्यांच्याशी आमचा आता संपर्कच नाही. आदेशने त्यांच्यासाठीही बरंच काही केलंय", असं ती म्हणाली.

शाहरुखने मदतीचं वचन दिलं अन् आता फोनच बंद..; अभिनेत्रीकडून खुलासा
गायक आदेश श्रीवास्तव यांचं कुटुंब आणि शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2024 | 8:23 AM
Share

गायक आदेश श्रीवास्तवचं 2015 मध्ये कॅन्सरने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अवितेश हा इंडिस्ट्रीत करिअर करण्यासाठी धडपड करतोय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदेशची पत्नी आणि अभिनेत्री विजयता पंडितने सुपरस्टार शाहरुख खानला त्याच्या मुलाची मदत करण्याची विनंती केली आहे. आयुष्याच्या शेवटचा घटका मोजत असताना आदेशने शाहरुखकडून वचन घेतल्याचा खुलासा विजयता यांनी या मुलाखतीत केला. मुलगा अवितेशकडे खुणावत त्याची मदत करण्यासाठीचा इशारा आदेशने दिला होता, असं विजयता म्हणाली.

शेवटच्या घटका मोजताना शाहरुखला खुणावलं

‘लेहरें रेट्रो’ला दिलेल्या या मुलाखतीत विजयता म्हणाली, “जेव्हा आदेश रुग्णालयात होता, तेव्हा शाहरुख खान आम्हाला भेटण्यासाठी यायचा. अखेरचा श्वास घेण्याच्या एक दिवस आधी आदेशने शाहरुखचा हात धरला आणि मुलगा अवितेशकडे खुणावलं. त्यावेळी तो काही बोलू शकला नव्हता, पण अवितेशकडे खुणावत जणू तो त्याची काळजी घेण्याची विनंती शाहरुखकडे करत होता.” आदेशच्या निधनानंतर शाहरुखने कुटुंबीयांशी कोणताच संपर्क न ठेवल्याचंही विजयताने म्हटलंय.

आता शाहरुखचा नंबर बंद

“आम्हाला जो मोबाइल नंबर दिला होता, तो आता बंद आहे. मला शाहरुखला ही आठवण करून द्यायची आहे की तो आदेश श्रीवास्तवचा खूप चांगला मित्र होता. हीच योग्य वेळ आहे शाहरुख. आम्हाला तुझी गरज आहे, माझ्या मुलाची मदत कर. त्याला फक्त थोड्याशा आधाराची गरज आहे. अवितेशसोबत तो रेड चिलीज बॅनरअंतर्गत चित्रपट बनवू शकतो. तो खूप चांगला अभिनेता आहे”, अशी विनंती विजयताने केली. आदेशचा मुलगा अवितेश हा सध्या ‘सिर्फ एक फ्रायडे’ या पदार्पणाच्या चित्रपटासाठी शूटिंग करतोय. विजयता ही संगीतकार जतीन-ललित यांची बहीण आहे. भावंडांनी शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीला त्याची कशाप्रकारे मदत केली, याचीही आठवण तिने या मुलाखतीत करून दिली.

शाहरुखकडे मदतीची विनंती

“आज शाहरुख खान खूप मोठा स्टार आहे. पण त्याच्या करिअरमध्ये माझ्या भावंडांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी त्याच्या दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे, कुछ कुछ होता है, राजू बन गया जेंटलमन यांसारख्या चित्रपटांसाठी सुपरहिट गाणी दिली. शाहरुख इंडस्ट्रीत आला तेव्हा खूपच नवीन होता. माझ्या भावांनी त्याच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे. त्याने याचा तरी किमान विचार करावा आणि माझ्या मुलाची मदत करावी”, असंही विजयता म्हणाली.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?