अभिनेत्री अवॉर्ड घ्यायला जाताना स्टेजवर पडली असती…; शाहरुखने जे केलं ते पाहून चाहते करतायत कौतुक
फिल्मफेअर 2025 च्या पुरस्कार सोहळ्यात एक अभिनेत्री पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर जात असताना अडखळली. तिचा तोल जाऊन ती पडणार तेवढ्यात शाहरूखने तिला वेळीच सावरलं आणि तिला पडण्यापासून वाचवलं. शाहरुखच्या या जेंटलमॅन कृतीचा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते त्याचे प्रचंड कौतुक करत आहेत. महिलांचा आदर करण्याच्या शाहरुखच्या वृत्तीचे हे आणखी एक उदाहरण असल्याचं चाहते म्हणत आहे.

अभिनेता शाहरूख खान हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सामान्यांपासून ते अगदी अभिनेत्रींपर्यंत सर्वजणच त्याचे चाहते आहे. शाहरूख खान हा अभिनेत्रींच्याबाबत नेहमीच जेंटलमन राहिला आहे. असं सगळेचजण म्हणतात. तो ज्या पद्धतीने महिलांचा आदर करतो त्याबद्दल सर्वांनाच त्याचे कौतुक वाटते. त्याच्या या वागण्याचे उदाहरण नुकतंच समोर आलं आहे.
फिल्मफेअरमधील हा व्हिडीओ व्हायरल
फिल्मफेअर 2025 मध्ये ‘लापता लेडीज’ने 13 पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा समावेश आहे. तथापि, अभिनेत्री नितांशी गोयलने सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाची ट्रॉफी जिंकली. पण तिचा व्हिडीओ सोशल मीडियालर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ती आणि शाहरूख खान दोघेही चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री पुरस्कार घ्यायला जात असताना अडखळली
व्हिडिओमध्ये,नितांशी तिचा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजकडे जाताना दिसत आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करत असलेला शाहरुख खान अभिनेत्रीचे स्वागत करण्यासाठी हात पुढे करून किला स्टेजवर येण्यासाठी मदत करतो तेव्हा नितांशी स्टेजच्या पायऱ्या चढताना अडखळते आणि तिचा तोल जातो. ती अडखळून पडली असती जर तिथे शाहरूख खान नसता तर. त्यावेळी किंग खानने परिस्थिती नीट हाताळली. तिचा हात धरत तिला पडण्यापासून वाचवले आणि तिचा तोल सावरला तसेच तिला स्टजवर येण्यासाठी मदत केली.
SRK Being The utmost Gentleman as He Helps Nitanshi Goel To The Stage To Accept Her Award ❤️@iamsrk @filmfare #SRK #ShahRukhKhan #KingKhan #King #GujaratTourism #FilmfareAwards2025 #Filmfareawards #Filmfare #FilmfareInGujarat #KuchhDinToGuzaroGujaratMein… pic.twitter.com/8GMEiVoDS3
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) October 11, 2025
करण जोहरने दाखवली काळजी
व्हिडिओमध्ये नितांशीने लांब पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे, तर शाहरुख खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये आहे. दोघे बोलत स्टेजवर जात अशताना. शाहरुखने रोमँटीक अदाजात त्याने नितांशीचा गाऊन सावरलेला दिसत आहे. त्यानंतर अक्षय कुमार नितांशीला पुरस्कार देतो, तर करण जोहर तिला मिठी मारतो आणि विचारतो की ती ठीक आहे का?
शाहरूखच्या वर्तनाचे कौतुक
हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहते शाहरूखचं खूप कौतुक करताना दिसत आहेत. चाहते व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका महिला युजरने लिहिले आहे “शाहरुख खान एक सज्जन आहे. हे खूप गोंडस आहे.” तर एकाने लिहिले, “नितांशीचा जेनिफर लॉरेन्स क्षण.” म्हणजे काही वर्षांपूर्वी दोन ऑस्कर पुरस्कार घेत असताना जेनिफर लॉरेन्स देखील स्टेजवर चढताना पडली होती.
दरम्यान ‘लापता लेडीज’ हा किरण राव दिग्दर्शित आहे आणि आमिर खानच्या बॅनरखाली निर्मित आहे. या चित्रपटाला 13 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, जो यापूर्वी रणवीर सिंगच्या गली बॉय चित्रपटाच्या नावावर होते.
